Breaking News

बर्मिंगहॅम येथील राष्ट्रकुल स्पर्धेत दोन भारतीयांचा “गोल्डन पंच” बॉक्सींगमध्ये नीतू घागंस आणि अमित पंघालने मिळविले गोल्ड मेडल

मागील काही दिवसांपासून इंग्लड येथील बर्मिंगहॅम येथे राष्ट्रकुल स्पर्धा होत असून या स्पर्धेत आज दोन भारतीय खेळाडूंनी वाखणण्यासारखी कामगिरी करत गोल्डन पंच लगावत बॉक्सींगमध्ये भारताला दोन गोल्डमेडल मिळवून दिले. स्पर्धेच्या दहाव्या दिवशी महिलांच्या ४८ किली वजनी गटात नितू घांगसने तर तिच्या पाठोपाठ अमित पंघालनेही अंतिम सामन्यात विजय मिळवून गोल्ड मेडल मिळवले. त्यामुळे भारताच्या खात्यात आता १५ गोल्ड मेडल झाली आहेत.

नितूने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ४८ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत इंग्लंडच्या डेमी जेडचा पराभव केला. २१ वर्षीय नितूच्या शानदार हल्ल्याला डेमी जेडकडे कोणतेही उत्तर नसल्यामुळे तिला सहज विजय मिळाला. तिने यावर्षी भारताला बॉक्सिंगमध्ये पहिले पदक मिळवून दिले. नितूच्या विजयामुळे भारताला एकूण ४१वे पदक मिळाले.

नितूनंतर पुरुषांच्या बॉक्सिंगमध्ये अमित पंघालने गोल्ड मेडल जिंकले. अमितने पुरुषांच्या फ्लायवेट गटातील अंतिम फेरीत इंग्लंडच्या कियारन मॅकडोनाल्डचा पराभव केला. राष्ट्रकुल स्पर्धेतील हे त्याचे पहिले-वहिले गोल्ड मेडल ठरले. गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.

१६वर्षीय अमितला गेल्या वर्षी ऑलिंपिकमध्ये सुरुवातीच्या फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने कोणतीही चूक न करता अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. नितू आणि अमितच्या पदकांमुळे भारताची एकूण पदक संख्या ४३ झाली असून त्यात १५ सुवर्ण, ११ रौप्य आणि १७ कांस्य पदकांचा समावेश आहे.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *