Breaking News

Tag Archives: shivsena

एकनाश शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकल्यावर उध्दव ठाकरे यांचे आव्हान हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूका घेऊन दा‌खवा

संसदीय राजकारणात काल संध्याकाळी नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उध्दव ठाकरे गटाच्या सुनिल प्रभू यांना प्रतोद म्हणून आणि अजय चौधरी यांना देण्यात आलेली गटनेते पदाचीही मान्यता काढून घेत शिवसेनेला मोठा धक्का दिला. त्यानंतर आज सकाळी आमदार संतोष बांगर यांनीही उध्दव ठाकरेंच्या गटातून थेट एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत …

Read More »

गुलाबराव पाटील म्हणाले; शिवसेना सोडली नाही, पण उठाव केलाय अजित पवार, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्या टीकेला दिले प्रत्युत्तर

विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बहुमत चाचणी जिंकली. त्यानंतर विधानसभेत अभिनंदन पर प्रस्तावावरील चर्चे दरम्यान शिवसेनेतील बंडखोर आमदार बंडखोरीबाबत काय भूमिका मांडतात याविषयी उत्सुकता लागून राहिली होती. यावेळी अजित पवार यांनी सांगितलेल्या वाक्याचा धागा पकडत बंडखोर आमदार गुलाबराव पाटील …

Read More »

अजित पवार म्हणाले, एकनाथ शिंदे मोठे नेते तर मग एकच खाते का? सगळ्या आमदारांमध्ये फडणवीसच नशीबवान

विधानसभेच्या दोन दिवसीय विधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने बहुमत चाचणी जिंकल्यानंतर सत्ताधारी बाकाकडून अभिनंदनपर प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावरील चर्चे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी तुफान टोलेबाजी केली. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना उद्देशून म्हणाले की, तुम्ही वकील आहात. त्यामुळे आज तुम्ही …

Read More »

भास्कर जाधव यांचा आरोप; शिवसेनेला आपसात लढवून संपवणं, हा भाजपाचा डाव शिवसेना वाचविण्यासाठी दोन पावले माघारी घ्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बहुमत चाचणी जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अभिनंदनपर प्रस्तावावरील चर्चेत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपाच्या विरोधात तुफान फटकेबाजी करत म्हणाले, शिवसेनेला आपसात लढवून संपवणं, हा भाजपाचा डाव असल्याचा आरोप करत एकनाथ शिंदे साहेब शिवसेना …

Read More »

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, हे सगळे आले ते ईडीमुळेच… विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर अभिनंदन ठरावावरील चर्चे दरम्यान केला गौप्यस्फोट

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनाचा ठराव मांडताना म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांकडे अंगुली निर्देश करत हे सगळे आलेत ते ईडीमुळे आलेत असे सांगत थोडा पॉज घेतला. त्यामुळे सभागृहात बंडखोर आमदारांसह सर्वच आमदारांमध्ये …

Read More »

शरद पवार म्हणाले; शिंदे-फडणवीस सरकारमध्ये असंतुष्टच, कधीही कोसळेल मध्यावधी निवडणुकांची शक्यता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विधानसभेचा पाया मजबूत करा

राज्यातील शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारत बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी वेगळी चुल मांडत भाजपाच्या मदतीने राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. तसेच उद्या सोमवारी ४ जुलै २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार बहुमत चाचणीलाही सामोरे जाणार आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले; आज ही फक्त पार्श्वभूमी उद्या सगळंच सांगतो एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेला इशारा

एकाबाजूला माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता तर दुसऱ्याबाजूला देश पातळीवर, राज्य पातळीवर नेतृत्व करणारे बडे बडे नेते होते. माझ्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांना विविध आमिषे दाखविली, त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण माझ्यासोबतचे सहकारी जराही हलले नाहीत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगत असतानाच सत्ताधारी बाकावरील एका आमदाराने आता नको उद्या बोला अशी सूचना …

Read More »

अबु आझमी यांचे आव्हान, नावं बदलण्यापेक्षा बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं शहर वसवा उध्दव ठाकरेंवर साधला निशाणा

शिवसेनेत बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली वेगळी चूल मांडत भाजपाच्या पाठिंब्याने राज्यात सत्ता स्थापन केली. शिंदे-फडणवीस सरकारला बहुमत सिध्द करण्यासाठी बोलाविलेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणूकीत भाजपा आमदार राहुल नार्वेकर यांचा विजय झाला. त्यानंतर मांडण्यात आलेल्या अभिनंदनपर प्रस्तावावर बोलताना समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबु आझमी म्हणाले, …

Read More »

आदित्य ठाकरे यांचे प्रत्युत्तर, फडणवीसांनी कानात सांगितलेले ऐकले असते तर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांना आदित्यचे उत्तर

विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिमटा काढत, एकनाथ शिंदे आणि मी एकत्र काम केलं आहे. बंडखोरी कशामुळे घडली, नेमकं काय घडलं याची माहिती नाही. मात्र, एकनाथ शिंदे यांनी माझ्या कानात सांगितलं असतं की, ‘अजित, उद्धव ठाकरेंना सांग, अडीच वर्षे झालेत, आता अडीच वर्षे …

Read More »

अजित पवार यांचा एकनाथ शिंदेना चिमटा, “हळूच माझ्या कानात तरी सांगायचं ना” उध्दव ठाकरेंना सांगून आम्हीच तुम्हाला बसविलं असतं

शिवसेनेत झालेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर हे बंड कसे झाले? का झाले? यावरून तर्क वितर्क व्यक्त केले जात असताना नेमक्या याच गोष्टीचा धागा माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना चिमटा काढत भाजपामधील अनेकांवर टोलेबाजी केल्याचे चित्र आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनात पाह्यला मिळाले. त्यामुळे अजित पवार यांच्या …

Read More »