Breaking News

अबु आझमी यांचे आव्हान, नावं बदलण्यापेक्षा बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं शहर वसवा उध्दव ठाकरेंवर साधला निशाणा

शिवसेनेत बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली वेगळी चूल मांडत भाजपाच्या पाठिंब्याने राज्यात सत्ता स्थापन केली. शिंदे-फडणवीस सरकारला बहुमत सिध्द करण्यासाठी बोलाविलेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणूकीत भाजपा आमदार राहुल नार्वेकर यांचा विजय झाला. त्यानंतर मांडण्यात आलेल्या अभिनंदनपर प्रस्तावावर बोलताना समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबु आझमी म्हणाले, मुस्लिमांची नावे असलेल्या शहरांची नावे कशाला बदलता, त्यातून काय रोजगार निर्माण होणार आहे का? असा खोचक सवाल करत त्यापेक्षा बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने नवे शहर वसवा मी तुमचे टाळ्या वाजवून स्वागत करेन असे सांगत तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराच्या निर्णयावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

शिवसेनेसाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या नामांतरांना माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर, तर उस्मानाबादचे नाव धाराशीव करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. याचे पडसाद विधानसभेच्या दोन दिवसीय अधिवेशात उमटले.

जाता जाता उद्धव ठाकरेंनी औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव बदलून टाकले. देशाचा महाराष्ट्राचा विकास होत असले तर मला काही आक्षेप नाही. शहरांची नावं बदलून काय संदेश देणार आहात? मुस्लिमांची नावं बदलून काय संदेश दिला जात आहे. बाळासाहेबांच्या नावे मोठी शहरं बनवा, आम्ही टाळ्या वाजवून स्वागत करु. नावं बदलून रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहे का? असा खोचक सवालही त्यांनी केला.

त्यावर नवनिर्वाचित विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फक्त प्रस्तावावर बोला, तुमचं म्हणणे नंतरही मांडता येईल असे सांगत प्रस्तावावर बोलण्याची सूचना केली. त्यावेळी शिवेसनेच्या सदस्यांनी आरडा ओरडा करण्यास सुरुवात करून गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

परंतु शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी पॉईट ऑफ ऑर्डर हा मुद्दा उपस्थित करत म्हणाले की, औरंगजेब अतिरेकी होता, त्याने आमच्यावर अत्याचार केला म्हणून नाव बदलून संभाजी महाराजांचं नाव दिलं आहे. मुस्लिम आणि हिंदू असा भेदभाव नाही इतकंच सांगायचं आहे असे स्पष्ट केले.

दरम्यान, औरंगाबाद विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने यापूर्वीच केला. मात्र, केंद्र सरकारने त्यास अजूनही मंजुरी दिलेली नाही. आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेला हिंदुत्ववादी प्रतिमेसाठी नामांतराचा विषय महत्त्वाचा होता. या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाकडून औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशीव करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात आला होता आणि तो मंजूरही झाला.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *