Breaking News

Tag Archives: shivsena

अजित पवार यांचा टोला; युतीच्या काळात मानसन्मान मिळत नाही म्हणून एकनाथ शिंदेनी… धास्तीने फक्त दोघांचा शपथविधी

राज्यातील सत्तांतरानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरांवर पहिल्यांदाच टीका करताना म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादीबद्दल ते म्हणाले की हे निधी देत नव्हते. पण मी तुम्हाला सांगतो की, मागच्या टर्मला जेव्हा फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सरकार होतं, तेव्हा त्यांनी मंत्री आणि राज्यमंत्री म्हणून फक्त १२ लोकांना संधी दिली होती. …

Read More »

संजय राऊतांच्या टीकेवर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले; कसले खोके, मिठाईचे का? मुंबई तोडण्याच्या आरोपावर शिंदे म्हणाले अशी काही चर्चा आमच्यात नाही

महाराष्ट्रात शिवसेनेचे बंडखोर नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केल्यानंतर पहिल्यांदाच दिल्लीवारीवर आले. काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची तर आज सकाळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

संजय राऊत यांचा बंडखोरांवर निशाणा; ५० खोके पचणार नाहीत, कशाला कारणे देताय… शांत बसा आणि ठरवा नेमकी शिवसेना कशासाठी सोडली उगीच मानसकि गोंधळ करू नका

राज्यात शिवसेनेतील बंडाळीनंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या मदतीने सरकार स्थापन केले. मात्र ११-१२ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात या बंडखोरीवर निर्णय होणार असल्याने या बंडखोरीवरून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, प्रवक्ते संजय राऊत यांच्याकडून बंडखोरांवर सातत्याने टीका करण्यात येत आहे. सध्या नाशिक दौऱ्यावर असलेले शिवसेना नेते तथा प्रवक्ते संजय राऊत यांनी बंडखोरांवर …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा बंडखोरांवर निशाणा, आजारपणाचा फायदा घेत घात केला आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेला आजपासून सुरुवात

युवासेना प्रमुख, शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेला आजपासून सुरुवात झाली. आदित्य ठाकरे यांनी भायखळा येथील शाखा क्र. २१६ ला भेट शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर बोलताना आजारपणाचा फायदा घेत घात केला असा गंभीर आरोप करत भावनित साद घातली. जे कोणी मातोश्रीवर येत आहेत त्यांची निष्ठा …

Read More »

समृध्दीला दिलेले बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वगळले? मुख्यमंत्री शिंदेंकडूनच उल्लेख नाही महाराष्ट्राच्या विकासाचा साक्षीदार अन् शेतकऱ्यांच्या उन्नतीचा ठरेल

तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने समृध्दी महामार्गाला शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देत त्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता घेत शासन निर्णयही जारी करण्यात आला. मात्र आता शिवसेनेत केलेल्या बंडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक असल्याचे वारंवार सांगत आहेत. मात्र आज …

Read More »

उध्दव ठाकरे यांचा सवाल, जे सन्मानाने झालं असते ते घातापाताने का? भाजपासह बंडखोरांवर साधला निशाणा

तसेच ४० आमदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला गळती लागली असून ठाणे महानगरपालिकेचे एक महिला नगरसेविका वगळता सर्व माजी नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. या बंडखोरीनंतर शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात कायदेशीर लढाई सुरु झाल्याचं बोललं जात असल्याचे सांगण्यात येत असून यापार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बंडखोरासह भाजपाला खोचक सवाल करत जे सन्मानाने …

Read More »

उध्दव ठाकरे यांचे बंडखोरांना प्रत्युत्तर, बोलत नसलेले तिथे गेल्याने आता बोलू लागले बंडखोरांचे प्रवक्ते दिपक केसरकर, संजय राठोड यांच्या वक्तव्यानंतर टीकास्त्र

इतके दिवस जे गप्प होते ते आता तिथे जाऊन बोलू लागले आहेत. मातोश्रीने सन्मानाने बोलवलं आणि भाजपाशी बोलणी केली तर येऊ असं म्हणत आहेत. मी यापूर्वीही त्यांना सूरतेला जाण्यापेक्षा सूरत (चेहरा) दाखवून इथेच बोलला असतात तर अधिक बरं झालं असतं असं म्हटलं होतं. ते पर्यटन करण्याची काही गरज नव्हती असा …

Read More »

एकनाथ शिंदे फेम बंड ब्रिटनमध्येही; पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा राजीनामा ४० पेक्षा अधिक मंत्र्यांचे राजीनामे

साधारणत: १२ ते १५ दिवसांपूर्वी महाराष्ट्रात शिवसेनेतील नंबर दोनचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित मंत्र्यांसह  ४० आमदार आणि १० समर्थक आमदारांना घेवून वेगळी चूल मांडली. त्यामुळे राज्यात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या महाविकास आघाडी सरकारला राजीनामा द्यावा लागला. नेमकी काहीसे अशाच प्रकारच्या …

Read More »

उध्दव ठाकरेंवरील ‘त्या’ टीकेवर राऊत म्हणाले, शिंदेंच्या विद्वत्तेबद्दल संशोधन करावं लागेल ट्विट तरी करता येत का ? खोचक सवाल

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानसभेतील भाषणावर टीका केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर पलटवार करताना रिक्षाच्या वेगाने मर्सिडीजला मागे टाकले असा खोचक टोला लगावला होता. या टीकेबाबत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या विद्वत्तेबद्दल संशोधन करावं लागेल. …

Read More »

शिवसेनेला ठाण्यानंतर आता नवी मुंबईतही धक्का: एक नगरसेविका मात्र विरोधात ठाणे महापालिकेतील ६६ तर नवी मुंबईतील ३०-३२ जण शिंदे गटात जाणार

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत सेनेतील ४० आमदारांना घेवून स्वतंत्र चूल मांडत मुख्यमंत्री पदाची शपथ घेत भाजपाच्या मदतीने राज्यात सरकारही स्थापन केले. या बंडाचे पडसाद आता स्थानिक पातळीवर पडत असून एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे महानगरपालिकेतील ६७ …

Read More »