Breaking News

Tag Archives: shivsena

परमबीर सिंह व शिवसेनेचं साटंलोटं असल्याचे सरकारी वकिलांच्या वक्तव्यावरून सिद्ध चौकशी सीबीआय कडे सोपवा- आ. अतुल भातखळकर

मुंबई प्रतिनिधी परमवीर सिंह यांच्याविरोधात राज्य सरकारने दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या तपासासाठी राज्याचे पोलिस अधिकारीच मदत करत नसल्याचे स्वतः सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगून टाकले, त्यामुळे पहिल्या दिवसापासून परमबीर सिंह व शिवसेनेचं साटंलोटं असल्याचा माझा आरोप सरकारी वकिलांच्या वक्तव्यावरून सिध्द झाला असल्याचा दावा भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर …

Read More »

चंद्रकांत पाटील म्हणाले, “अब हिंदू मार नहीं खाएगा” अमरावती हिंसाचारानंतर भाजपाची प्रतिक्रिया

पुणे: प्रतिनिधी त्रिपुरामध्ये घटना घडली की नाही हा प्रश्न आहे. पण त्यासाठी अमरावती, नांदेड, मालेगाव मध्ये अशांतता पसरवणे हे कितपत योग्य आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये जे घडलं ती, हिंदुंची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. अब हिंदू  मार नहीं खाएगा, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.‌ पुण्यात आयोजित एका कार्यक्रमापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. १९९३ च्या दंगलीत …

Read More »

जिल्ह्याच्या ठिकाणी जायची गरज नाही, प्रत्येक तालुक्यात प्रशासकिय इमारत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

अहमदनगर: प्रतिनिधी कर्जत शहर व तालुक्यातील रस्ते आणि विविध विकास कामांसाठी नियोजन करण्यात आले आहे. या विकासकामांमुळे कर्जत शहराच्या वैभवात भर पडणार आहे. राज्यातील सर्व तालुक्यात टप्प्याटप्प्याने प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत येथे सांगितले. कर्जत शहरातील व तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्याप्रसंगी,आयोजित सभेत उपमुख्यमंत्री पवार बोलत …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसनंतर शिवसेनेने दिला पहिल्यांदाच नवाब मलिकांना पाठिंबा मलिकांनी नीट कार्यक्रम सुरु केल्याने ते मागे गेलेत

औरंगाबाद-मुंबई: प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांच्याकडून करण्यात येत असलेल्या आरोपांवर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मलिक एका चीडीतून या गोष्टी करत असल्याचे मत व्यक्त करत आता हे सगळं थाबायला हवं अशी भूमिका घेतली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील वगळता अद्याप तरी काँग्रेस आणि शिवसेनेने नवाब मलिक यांच्याकडून करण्यात …

Read More »

अनिल परब यांच्या घरासमोर उद्या आंदोलन: मात्र महामंडळाने १७ डेपोतून गाड्या सोडल्या आझाद मैदानावरचे ठिय्या आंदोलन सुरू

मुंबई: प्रतिनिधी मागील १५ दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आजही सुरुच असून उद्या परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरासमोर आणि आणि राज्यात एसटी डेपो समोर आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा आमदार सदाभाऊ खोत यांनी आझाद मैदानावर केली. तर परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी भाजपा नेत्यांच्या …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंवरील शस्त्रक्रिया यशस्वी- प्रकृती उत्तम, लवकरच कामावर रूजू सीएमओ कार्यालय आणि खासदार संजय राऊत यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती एच.एन. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ अजित देसाई आणि डॉ शेखर भोजराज यांनी दिली आहे. तर पुढील तीन ते चार दिवसात मुख्यमंत्री कामावर रूजू होणार असल्याची माहिती शिवसेना प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी दिली. मानेच्या दुखण्यामुळे काल रूग्णालयात मुख्यमंत्री …

Read More »

मुख्यमंत्री रूग्णालयात दाखल म्हणाले…म्हणलं तरी थोडसं दुर्लक्षच झालं केले आवाहन: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रकृतीसंदर्भात निवेदन

मुंबई: प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या प्रकृतीसंदर्भात निवेदन केले असून मुख्यमंत्री ठाकरे यांनी निवेदनात म्हटले आहे की, गेल्या सुमारे दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असतांना दुसरीकडे आपले जीवनचक्र सुरू राहावे, राज्यातली विकासकामे सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्याने प्रयत्न करतोय. …

Read More »

फडणवीस-मलिकांच्या आरोप प्रत्यारोपावर संजय राऊत म्हणाले…आता हस्तक्षेपाची वेळ मलिक हे एका चीडीतून हे सगळं करतायत

मुंबई: प्रतिनिधी सध्या जे काही सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या बदनामीलाच हातभार लागत असून यात आता मोठ्याने हस्तक्षेप करण्याची वेळ आलेली आहे. तसेच या दोन्ही पैकी एका नेत्याने आता हे थाबविण्याची गरज आहे. मला माहित आहे की, नवाब मलिक यांच्या जावायावर झालेल्या कारवाईमुळे ते चिडीने हे सगळं करत आहेत. काल मी …

Read More »

मुंबई महापालिकेच्या निर्वाचित सदस्य संख्या वाढीसह मंत्रिमंडळाने घेतले हे ३ निर्णय महापालिकेतील नगरसेवकांची संख्या आता २३६ होणार

मुंबई: प्रतिनिधी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढविण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यानुसार आता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निर्वाचित सदस्य-नगरसेवकांची संख्या २३६ अशी होणार आहे. मुंबई महानगरपालिका अधिनियमातील (1888 चा 3) कलम ५ मध्ये महानगरपालिकेच्या निर्वाचित सदस्यांची संख्या २२७ इतकी आहे. ही संख्या २००१ च्या जनगणनेच्या आकडेवारी …

Read More »

पीएचडी-सेट-नेटधारकांसाठी खुषखबर: प्राध्यापक-प्राचार्य पदभरतीचा मार्ग मोकळा प्राध्यापकांची २०८८ तर प्राचार्यांची ३७० रिक्त पदे भरण्यास मान्यता- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबई : प्रतिनिधी उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील ३७० प्राचार्य व २०८८ सहाय्यक प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. आरोग्य विषयक कारणास्तव प्रलंबित असलेल्या भरती प्रक्रियेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार …

Read More »