Breaking News

एकनाथ शिंदे फेम बंड ब्रिटनमध्येही; पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा राजीनामा ४० पेक्षा अधिक मंत्र्यांचे राजीनामे

साधारणत: १२ ते १५ दिवसांपूर्वी महाराष्ट्रात शिवसेनेतील नंबर दोनचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित मंत्र्यांसह  ४० आमदार आणि १० समर्थक आमदारांना घेवून वेगळी चूल मांडली. त्यामुळे राज्यात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या महाविकास आघाडी सरकारला राजीनामा द्यावा लागला. नेमकी काहीसे अशाच प्रकारच्या बंडाची पुनरावृत्ती ब्रिटन मध्ये झाली असून तेथील पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या विरोधात त्यांच्याच सरकारमधील ४० पेक्षा जास्त मंत्र्यांनी बंडखोरी करत राजीनामे दिले. त्यामुळे जॉन्सन यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात आल्याने अखेर बोरिस जॉन्सन यांनी आपल्या सरकारचाच आज राजीनामा दिला.

मागील काही दिवसांपासून ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या विरोधात पक्षांतर्गत विरोधकांकडून विविध भूमिका घेण्यात येत होती. तर दुसऱ्या २०२५ पर्यत जॉन्सनच पदावर राहणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र आता ४० हून अधिक मंत्र्यांनी बंडखोरी करत राजीनामे दिल्याने जॉन्सन यांनी राजीनामा दिला. जो पर्यंत नव्या पंतप्रधानांची घोषणा होत नाही, तोपर्यंत जॉन्सन पदभार सांभाळणार आहेत. मला माझ्या कामगिरीचा प्रचंड अभिमान आहे, जोपर्यंत नवीन नेता येत नाही तोपर्यंत मी काम करत राहीन, असं मत बोरिस जॉन्सन यांनी व्यक्त केले.

अविश्वासाचा आरोप करत बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळातील ४० पेक्षा जास्त आमदारांनी आपला राजीनामा दिला होता. त्यामुळे बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्याचीही मागणी जोर धरु लागली होती. ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी सर्वप्रथम ५ जुलै रोजी आपला राजीनामा दिला होता. त्यानंतर आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तसेच बोरिस जॉन्सन यांच्या कट्टर समर्थक प्रिती पटेल यांनीही बोरिस जॉन्सन यांच्यावर विश्वास नसल्याचे कारण देत आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.

ऋषी सुनक यांच्या अर्थमंत्री पदाच्या राजीनाम्यानंर बोरिस जॉन्सन यांनी नदिम जाहवी यांची अर्थमंत्री म्हणून नियुक्ती केली होती. अर्थमंत्री नियुक्ती झाल्यानंतर नदिम जाहवी यांनीही ट्वीट करत जॉन्सन पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याचा सल्ला दिला होता.

बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमधून अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर ऋषी सुनक हे ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार असल्याचे सांगण्यात येत आहे. ऋषी सुनक मूळचे भारतीय असून इन्फोसेसचे सह संस्थापक नारायण मूर्तींचे जावई आहेत. सुनक यांच्या व्यतरिक्त पेनी मॉरडॉन्ट, बेन वॉलेस, साजिद वाजिद, लिज ट्रस, डोमिनिक राब यांचे सुद्धा नाव पंतप्रधान पदाच्या शर्यतीत घेण्यात येत आहे.

Check Also

राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; तर या चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *