Breaking News

Tag Archives: shivsena

तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरेंच्या ‘त्या’ निर्णयाची शिंदेंकडून कॉपी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांचा कार्यगट स्थापन

केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कार्यगटात उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण, शालेय शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय शिक्षण व औषधे द्रव्ये, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय, कौशल्य विकास व उद्योजकता या खात्यांचे मंत्री यांचा समावेश केला होता. …

Read More »

भाजपा म्हणते, शिवसेनेबाबत एकनाथ शिंदे यांची भीती खरी ठरली मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांचे वक्तव्य

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला राज्यभरात अभुतपूर्व यश मिळाले आहे. भाजपा हा राज्यातील क्रमांक एकचा पक्ष झाला असल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीतून दिसत आहे. महाराष्ट्रातील जनता आणि मराठी माणसामुळेच हे यश भाजपाला मिळाले असून आम्ही नम्रतेने हा विजय स्वीकारतो. जनतेची सेवा आणखी दुप्पट वेगाने करु, असा विश्वास व्यक्त करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्व. …

Read More »

उध्दव ठाकरे यांच्या टीकेवरून नारायण राणे यांनी साधला निशाणा, मला फोन करावा मी सांगतो काँग्रेसच्या खुलाशावर मात्र साधली चुप्पी

आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधत नामिबियातून भारतातून आणण्यात आलेले ८ चित्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:च्या हाताने मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडले. यानिमित्ताने तब्बल ७० वर्षानंतर नामशेष झालेला चित्ता भारतात पुन्हा दाखल झाला. नरेंद्र मोदी यांचा हा प्रकल्प मानण्यात येत आहे. मात्र, यावरुन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधत …

Read More »

नारायण राणे म्हणाले, त्या प्रकल्पाला कोणाचाही विरोध चालू देणार नाही काँग्रेस, शिवसेनेला दिला इशारा

फडणवीस सरकारच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नाणार येथील रिफायनरीला विरोध केला. त्यानंतर उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर रिफायनरीचा प्रकल्प नाणारऐवजी बारसू गावात करण्याची तयारी दर्शविली. त्यातच आता या प्रकल्पावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कोकणचा दौरा करत स्थानिक नागरिकांची मते जाणून घेतली. त्यानंतर या रिफायनरी प्रकल्पाला …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा सवाल, महाराष्ट्र पाकिस्तान आहे का जो प्रकल्प गुजरातला पळवला महाराष्ट्राचा, तरुणांचा आवाज बुलंद करणं हा आपल्या देशात गुन्हा झालाय का?

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी वेदांता प्रकल्पावरून शिंदे-फडणवीस सरकारला चांगलं घेरलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुजरात पाकिस्तान आहे का या वक्तव्याचा आदित्य ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. महाराष्ट्र पाकिस्तान आहे की प्रकल्प गुजरातला पळवून लावला. महाराष्ट्राच्या मुलांनी काय चूक केली आहे, असा खरमरीत सवाल आदित्य ठाकरे यांनी …

Read More »

अरविंद सावंत म्हणाले, नवा धंदा आमच्याकडे या अन पावन व्हा टक्केवारीच्या वसुलीच्या चौकशीवरून लगावला टोला

वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकारवर होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर देण्याच्या नादात भाजपा नेत्यांकडून आता आदित्य ठाकरे, उध्दव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवित आहेत. त्यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी वेदांत फॉक्सकॉनबरोबर चर्चा सुरु असताना टक्केवारी मागितल्याचा आरोप करत त्याची चौकशी करण्याची …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, यापूर्वी जे करत आलो तेच करायचंय

अवघ्या काही दिवसानंतर नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार असून लगेच दसरा हा सण साजरा करण्यात येणार आहे. दसऱ्या दिवशी शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात साजरा करण्यात येतो. परंतु दसरा मेळाव्यासाठी उध्दव ठाकरे यांच्या गटाबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटानेही मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे. या दोघांच्या अर्जाला जवळपास महिना उलटून …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा सवाल, उद्योगमंत्री कोण? जनता म्हणाली गद्दार मी राजीनामा देतो, ४० गद्दारांनी राजीनामा देऊन निवडणुकीला यावं

शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांची शिव संवाद यात्रा शुक्रवारी बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या रत्नागिरी मतदारसंघात होती. यावेळी आदित्य ठाकरे यांनी बंडखोरी पासून तरुणांच्या रोजगाराच्या मुद्यावरून खडेबोल सुनावले आहेत. खोके सरकारमुळे महाराष्ट्रातील तरुणांवर बेरोजगारीची वेळ आली आहे, अशी सडकून टीका करत आदित्य ठाकरे यांनी उद्योगमंत्री कोण …

Read More »

आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याच्या आतली बातमी उदय सामंत समर्थकांकडून बाहेर आदित्य ठाकरे यांचा रत्नागिरी दौरा ! खुर्च्या एक हजार गप्पा दहा हजाराच्या..!

उद्या शुक्रवारी १६ सप्टेंबर रोजी माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे रत्नागिरीत येत आहेत. यापार्श्वभूमीवर उदय सामंत यांच्या समर्थकांकडून एक बातमीवजा आतली माहिती व्हायरल करण्यात येत आहे. सदरची बातमी खालील प्रमाणे… आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावर चर्चा व नियोजन करण्यासाठी रत्नागिरीत एक बैठक नुकतीच पार पडली. सुरूवातीला या दौऱ्याचा खर्च कोणी करायचा …

Read More »

उदय सामंत यांचा आदित्य ठाकरेंना सवाल, मग गुजरातपेक्षा चांगले पॅकेज तुम्ही का दिले नाही? नाणार रिफायनरीची ३.५ लाख कोटींची गुंतवणूक तरी गांभीर्याने घ्या!

फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याबद्दल कंठशोष करताना महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुजरातपेक्षा चांगले पॅकेज देण्यात कमी का पडलो, याचे उत्तर आदित्य ठाकरे, जयंत पाटील यांनी आधी द्यावे, अशी मागणी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी करतानाच आता तरी त्यापेक्षा दुपटीहून अधिक गुंतवणूक असलेल्या रिफायनरीच्या गुंतवणुकीत खोडा घालू नये, अशी विनंती केली आहे. …

Read More »