Breaking News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले; आज ही फक्त पार्श्वभूमी उद्या सगळंच सांगतो एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेला इशारा

एकाबाजूला माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता तर दुसऱ्याबाजूला देश पातळीवर, राज्य पातळीवर नेतृत्व करणारे बडे बडे नेते होते. माझ्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांना विविध आमिषे दाखविली, त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण माझ्यासोबतचे सहकारी जराही हलले नाहीत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगत असतानाच सत्ताधारी बाकावरील एका आमदाराने आता नको उद्या बोला अशी सूचना करताच त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले आज फक्त पार्श्वभूमी सांगितली उद्या सगळंच सांगणार असल्याचा इशारा शिवसेनेला दिला.

शिंदे-फडणवीस सरकारला बहुमत सिध्द करण्यासाठी विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशन घेण्यात आले. आज रिक्त विधानसभेच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणूकीत भाजपाचे आमदार राहुल नार्वेकर यांचा विजय होवून त्यांना विधानसभेच्या अध्यक्ष पदावर विराजमान केले. त्यानंतर नार्वेकर यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडताना त्यांनी वरील इशारा दिला.
साधारणपणे विरोधकांतून सत्तेकडे कोणीही जातात. मात्र इथे सत्तेवरून पुन्हा विरोधकाकडे न जाता थेट सत्तेच्या बाहेरच काहीजण गेल्याचा टोला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना लगावला.

त्यावेळी अनेकजण दावे करत होते आमच्या संपर्कात इतके जण तितके जण आता कुठे गेले ते त्यांच्या संपर्कात असलेले असा खोचक सवाल करत मी म्हणालो नावं द्या त्या सगळ्यांना स्पेशल विमानाने परत पाठवून देतो. पण त्यांनी नावे काही दिली नाहीत. आमच्यासोबत आलेला एकजण परत जातो म्हणाला तर त्याला स्पेशल विमानाने परत पाठवून दिले. कोणावरही जबरदस्ती केलेली नाही की कोणाला बळजबरी केली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

एकाबाजूला माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता तर दुसऱ्याबाजूला देश पातळीवर, राज्य पातळीवर नेतृत्व करणारे बडे बडे नेते होते. माझ्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांना विविध आमिषे दाखविली, त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण माझ्यासोबतचे सहकारी जराही हलले नाहीत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगत असतानाच सत्ताधारी बाकावरील एका आमदाराने आता नको उद्या बोला अशी सूचना करताच त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले आज फक्त पार्श्वभूमी सांगितली उद्या सगळंच सांगणार असल्याचा इशारा शिवसेनेला दिला.

भाजपाकडे ११५ आणि आमच्याकडे ५० आमदार असताना त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. मला काहीही नको होते, मुख्यमंत्री पदाची अपेक्षा नव्हती. मात्र, भाजपाने माझा सन्मान केला. माझ्या वैचारीक भूमिकेला पाठिंबा दिला. भाजपाचा हा निर्णय डोळ्यात अंजन घालणारा आहे, असा टोलाही त्यांनी शिवसेनेचे नाव न घेता लगावला.
गेल्या काही दिवसात ज्या घटना घडल्या त्याची नोंद देश पातळीवर घेतली गेली. सर्वसाधारणपणे आमदार विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षात जातात. मात्र, इकडे माझ्यासह ९ मंत्री सत्तेतून पायउतार झाले. समोर मोठे नाते असतानाही ५० आमदारांनी बाळासाहेबांच्या आणि दिघे साहेबांच्या सैनिकावर विश्वास टाकला. एकही आमदार हलला नाही. त्यांना हलविण्याचे प्रयत्न झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
भाजपकडे ११५ आमदार असताना त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून मला मुख्यमंत्री केले, असे सांगून शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी, नड्डा यांचे त्यांनी यावेळी आभार मानले.

Check Also

गडकरींकडून आदर्श आचारसंहितेचा भंग, गडकरी व आमदार मोहन मतेंवर गुन्हा नोंदवा

भारतीय जनता पक्ष सर्वकायदे धाब्यावर बसवून सातत्याने आचारसंहितेचा भंग करत आहे. भारतीय जनता पक्षाचे नागपूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *