Breaking News

Tag Archives: shivsena

सरनाईक गुवाहाटीला गेल्याचा किस्सा सांगण्याऱ्या संजय राऊत यांनी दिली ‘नवी’ माहिती मलाही गुवाहाटीची ऑफर आली होती

काही दिवसांपूर्वी दहिसर येथील शिवसेना मेळाव्यात शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी भाषण करताना सांगितले की, मला प्रताप सरनाईक यांचा फोन आला होता. त्यावेळी ते दिल्लीत गेले होते. तेथे सरनाईक आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आणि फडणवीस यांनी प्रताप सरनाईक यांना थेट अमित शाह यांच्याकडे घेवून गेले. तेथे भेट झाल्यानंतर …

Read More »

फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पद का स्विकारले? चंद्रकांत पाटील यांनी दिले ‘हे’ उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या त्यागाचा भाजपाला अभिमान

भारतीय जनता पार्टीकडे सर्वाधिक आमदार असतानाही हिंदुत्वासाठी लढणाऱ्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्याग केला. तसेच नव्या सरकारने चांगल्या रितीने काम करण्यासाठी पक्षाच्या आदेशानुसार देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. त्यांच्या त्यागाचा भाजपाला अभिमान असून त्यांनी कार्यकर्त्यांसमोर पक्षशिस्तीचा आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही… एकनाथ शिंदे यांच्या कथित दाव्यावरून उध्दव ठाकरे यांचा पलटवार

शिवसेनेतील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची काल शपथ घेतली. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कालच नव्याने मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्विटरवरून शुभेच्छाही दिल्या. परंतु राज्यात नव्याने आलेल्या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नसल्याचे शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट …

Read More »

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची शपथ राजभवनात झाला समारंभ भाजपाचे अनेक केंद्रीय मंत्री आणि आमदार सहभागी

राज्याच्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देवून २४ तासही उलटत नाही, तोच राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज शपथ दिली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ …

Read More »

भाजपाने पाठिंबा जाहिर केल्यानंतर नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पदाची लालसा नाही हिंदूत्व आणि विकासासाठी ५० आमदारांचा निर्णय

तब्बल १० दिवसानंतर मुंबईत परतलेले एकनाथ शिंदे यांनी मुंबईत उतरताच थेट देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर पोहोचले. तेथे काही काळ देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरिष महाजन यांच्याबरोबर चर्चा केली. त्यानंतर हे सर्वजण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर गेले. तेथे गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल यांच्याकडे नव्या सत्ता …

Read More »

ठाकरेंच्या आव्हानाला भाजपाकडून एकनाथ शिंदेच्या माध्यमातून उत्तर, राज्यात शिदेंसरकार आजच होणार मुख्यमंत्री पदाचा शपथविधी

राज्यातील शिवसेनेतील बंडाळीमुळे अल्पमतात आलेल्या उध्दव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा काल राजीनामा दिला. मात्र काल मुख्यमंत्री पदाचा त्याग करत असल्याचे जाहिर करताना माझ्याऐवजी दुसरा मुख्यमंत्री शिवसेनेचाच झाला तर मला आनंदच आहे असे सांगत एकप्रकारे भाजपा आणि एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले. उध्दव ठाकरे यांच्या आव्हानाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस …

Read More »

उध्दव ठाकरेंच्या राजीनाम्यावरून राज ठाकरे म्हणाले, तर त्याचा ऱ्हासाकडे… ट्विट करत नाव न घेता केली टीका

शिवसेनेतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकाविल्यानंतर उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारमधील अनेक मंत्री आणि आमदारांनी शिंदे गटात सहभागी होणे पसंत केले. तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बहुमत चाचणी सिध्द करण्याचे दिलेल्या आदेशास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे अल्पमतात आलेल्या उध्दव ठाकरे यांनी काल …

Read More »

बंडखोरांचे प्रवक्ते दिपक केसरकर म्हणाले, तर त्या १६ जणांची आमदारकी धोक्यात उध्दव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर सत्तानाट्याला सुरुवात

२४ तासापूर्वी शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेल्या १६  आमदारांवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या गटाकडून अपात्रतेच्या कारवाईचा बडगा उगारला होता. त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातही लढाई लढली गेली. मात्र ती अद्याप अनिर्णित स्थितीत आहे. तर दुसऱ्याबाजूला उध्दव ठाकरे यांच्या समर्थक असलेल्या आमदारांची संख्याही १६ आहे. आता या १६ …

Read More »

एकनाथ शिंदे बंड; ३ ऱ्या अंकाचा शेवट उध्दव ठाकरे यांच्या पद आणि आमदारकीच्या राजीनाम्याने त्यांना त्यांचा आनंद पेढे खाऊन घेवू द्या कोणीही आडवे येणार नाही

राज्यातील शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले महाविकास आघाडी सरकार सर्वोच्च न्यायालयाचा धक्कादायक निकालानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आमदारकी आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे राज्यातील ठाकरे सरकार आज कोसळले. ज्या शिवसैनिकांनी त्यांच्या विजयाचा गुलाल उधळला त्याच शिवसैनिकांच्या रक्ताने मुंबईचे रस्ते रंगविणार होतात का असा सवाल करत सूरतहून …

Read More »

तीन तासाहून अधिक काळ सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद, मात्र मविआला धक्का राज्यपालांच्या आदेशानुसार बहुमत सिध्द करावे लागणार

बहुमत सिध्द करण्याबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बहुमत सिध्द करण्यासंदर्भात दिलेल्या आदेशाच्या विरोधात शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याप्रकरणी तात्काळ सुनावणी घेण्याची मागणी केली. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुर्यकांत आणि जे.पी. पर्डीवाला यांनी याप्रकरणी तब्बल तीन तासाहून अधिक काळ सर्व याचिकाकर्त्यांची मते ऐकून घेतली. त्यानंतर अखेर महाविकास आघाडी सरकारने उपस्थित …

Read More »