Breaking News

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, हे सगळे आले ते ईडीमुळेच… विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर अभिनंदन ठरावावरील चर्चे दरम्यान केला गौप्यस्फोट

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनाचा ठराव मांडताना म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांकडे अंगुली निर्देश करत हे सगळे आलेत ते ईडीमुळे आलेत असे सांगत थोडा पॉज घेतला. त्यामुळे सभागृहात बंडखोर आमदारांसह सर्वच आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली.

मात्र लगेच ती ईडी नव्हे तर ही ईडी म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या ईडीमुळे हे सगळे एकत्र आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विश्वास दर्शक ठराव जिंकून आज खऱ्या अर्थाने शिवसेना-भाजपा युतीचे सरकार राज्यात आले आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे ऐकणारे सरकार राहणार आहे. आजपासून हा नेता आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राज्यातील जनतेला एका फोनवर उपलब्ध राहणार आहेत. त्यामुळे कोणाला कसलीही अडचण आली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुढे येवून त्यातून मार्ग काढणारे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आज सभागृहाने विश्वास दाखविला आहे. काही जण पक्ष चालविल्या सारखे राज्य सरकार चालवू पहात होते. त्यामुळे त्यांना यातून बाहेर पडावे लागल्याचा टोला त्यांनी उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता यावेळी लगावला.

मागच्यावेळी मी सभागृहात एक कविता ऐकविली होती. मात्र त्या कवितेवरून माझी मोठ्या प्रमाणावर टिंगल झाली. अनेक टीकाही झाली. मात्र त्या सर्व विरोधकांनी माझ्याविरोधात केलेल्या गोष्टीचा आता बदला घेणार आहे असे सांगत फडणवीस यांनी थोडावेळ पॉज घेत म्हणाले तो बदला म्हणजे माझ्या सर्व विरोधकांना मी माफ करणार असल्याचे स्पष्ट केले.

सत्ता येते जाते मी त्या (विरोधकां) बाकावर होतो तेव्हा ही आणि आता याबाजूला असल्यानंतरही सत्ता येते जाते पण ग ची बाधा होणे चांगले नाही असे सांगत पोस्ट लिहिली म्हणून टाक तुरुंगात, विरोधात बोलले म्हणून टाक तुरुंगात हे तानाशाही योग्य नाही. राज्यात हे कृत्य करायचे आणि दिल्लीत जावून म्हणायचे ही तानाशाही असे सांगत इथे येवून ज्ञान पाजळायचे हे काही योग्य नसल्याचा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी उध्दव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांचे नाव न घेताल लगावला.

हनुमान चालिसाचा कार्यक्रम रद्द केल्यानंतरही त्या महिला खासदार आणि आमदारांना १२ दिवस तुरुंगात ठेवले. हे योग्य नाही केले. तर हा विरोधात बोलला म्हणून त्याच्या घरावर बुलडोझर चालवं, तो विरोधात बोलला म्हणून घरावर बुलडोझर चालवं या कशाच्या गोष्टी होत्या. सुदैवाने मी राज्य सरकारवर दररोज टीका करत होतो. पण माझ्या घरावर बुलडोझर चालविला गेला नाही. कारण माझे मुंबईत घर नाही आणि जे राहतो ते सरकारी घरात. त्यामुळे मी त्यातून वाचलो असा उपरोधिक टोलाही त्यांनी उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

Check Also

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन वयाच्या ७२ व्या वर्षी कर्करोगामुळे घेतला शेवटचा श्वास

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांचे सोमवारी वयाच्या ७२ व्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *