राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी महार वतनाची १८०० कोटी रूपये किंमतीची पुणे येथील कोरेगांव पार्क येथील ४० एकर जमिन खरेदी प्रकरणामुळे चांगलेच अडचणीत आले. तसेच ही जमिनी ३०० कोटी रूपयांना खरेदी करून फक्त ५०० रूपयांची स्टॅम्प ड्युटी भरल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला. त्यामुळे राजकिय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यातच आता याप्रकरणी काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल यांनी या प्रकरणी भाष्य करत पंतप्रधान मोदी यांना सवाल करत पार्थ पवार यांनी महार वतनाची जमिन खरेदी केल्याप्रकरणी मोदी गप्प का? असा सवाल केला.
दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश देत समितीची स्थापनाही यावेळी केली. त्यानंतर या प्रकरणात तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. तथापी, याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान मोदी यांनाच सवाल करत याप्रकरणावर गप्पा का असा सवाल केला.
महाराष्ट्र में ₹1800 करोड़ की सरकारी ज़मीन, जो दलितों के लिए आरक्षित थी, सिर्फ़ ₹300 करोड़ में मंत्री जी के बेटे की कंपनी को बेच दी गई।
ऊपर से स्टाम्प ड्यूटी भी हटा दी गई – मतलब एक तो लूट, और उसपर कानूनी मुहर में भी छूट!
ये है ‘ज़मीन चोरी’, उस सरकार की, जो खुद ‘वोट चोरी’ से… pic.twitter.com/HQeDmNvyYl
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 7, 2025
या प्रकरणी राहुल गांधी यांनी एक ट्विट करत म्हणाले की, महाराष्ट्रात दलितांसाठी राखीव असलेली १८०० कोटी रूपयांची सरकारी जमिन एका मंत्र्याच्या मुलाच्या कंपनीला अवघ्या ३०० कोटी रूपयांना विकण्यात आली. तसेच त्यावरील मुद्रांक शुल्कही माफ करण्यात आले. म्हणजे ही एक प्रकारची लूट आहे आणि त्यानंतर कायदेशीर सूट आहे. मत चोरी करून स्थापन झालेल्या सरकारची ही जमीन चोरी असल्याची टीका केली.
पुढे बोलताना राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, त्यांना माहिती आहे की, कितीही लुटलं तरी मत चोरी करून पुन्हा ते सत्तेवर परतणार आहेत. त्यांना ना लोकशाहीची काळजी आहे ? ना लोकांची? ना दलित हक्कांची? तुम्हाला लोकशाहीची जनतेची, दलितांच्या हक्काची पर्वा नाही. मोदीजी तुम्ही यावर गप्प का आहात ? कारण तुमचं सरकार दलित वंचितांचे हक्क हिसकावून घेणाऱ्या त्याच लुटारूंवरच टीकलं आहे अशा शब्दात मोदींवर टीका केली.
दरम्यान अजित पवार यांनी याप्रकरणी माध्यमांशी बोलताना सांगितले की, माध्यमांनी जे काही प्रकरण चालवले आहे. त्याची पूर्ण माहिती आता माझ्याकडे नाही. माझा त्या गोष्टीशी थेट किंवा दुरान्वयेदेखील संबध नाही. ३५ वर्षापासून महाराष्ट्रातील जनता मला ओळखते. मी या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेण्याचे ठरवले आहे. दोन-चार महिन्यापूर्वी असे काही तरी सुरु असल्याचे माझ्या कानावर आले होते. कोणत्याही चुकीच्या गोष्टी करू नयेत अशा सूचना मी दिल्या होत्या. पण मधल्या काळात काय झाले ? मला माहित नाही असा दावा केला.
Marathi e-Batmya