Breaking News

न्यायालय

Court

खिचडी घोटाळ्याप्रकऱणी सूरज चव्हाण यांच्या अटकेचे ईडीकडून समर्थन खिचडी घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण

कोरोना काळातील खिचडी घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी शिवसेना नेते (ठाकरे गट) आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच, राजकीय हितसंबंधांचा वापर करून त्यांनी खिचडी वापटाचे कंत्राट मिळवले होते, त्यामुळे चव्हाण यांची अटक कायदेशीर असल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी उच्च न्यायालयात केला. उच्च न्यायालयात सूरज चव्हाण …

Read More »

वकिलांचेच उच्च न्यायालयाला पत्रः बंदी मागे घ्या बंदी मागे घेण्यासाठी वकील संघटनेची मुख्य न्यायमूर्तींकडे पत्रव्यवहाराद्वारे मागणी

उच्च न्यायालयाच्या आवारात एकेरी वापराच्या प्लास्टिक बाटल्यांवरील बंदी मागे घेण्याची मागणी वकिलांच्या संघटनेने मुख्य न्यायमूर्तींना पत्रामार्फत केली आहे. बंदीच्या या निर्णयामुळे न्यायालयात येणाऱ्या पक्षकारांची, वकिलांची आणि कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्याची मागणीही संघटनेने पत्राद्वारे आज केली. प्लास्टिकमुळे होणारे प्रदुषण आणि कचऱ्याचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने …

Read More »

सरकारची न्यायालयात माहिती, बेकायदेशीररीत्या परवानगी देणाऱ्या ग्रामपंचायतींवर कारवाई राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती

अधिकार नसतानाही बेकायदेशीररीत्या महामार्गांवरील महाकाय जाहिरात फलकांना परवानगी देणाऱ्या ग्रामपंचायतींवर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असे आश्वासन राज्य सरकारने मंगळवारी उच्च न्यायालयात दिले. राज्याच्या ग्रामविकास विभागाने २६ नोव्हेंबर रोजी याबाबतचा शासन निर्णय काढला असून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी अशा फलकांना परवानगी देण्यास मज्जाव केला. तसे न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा …

Read More »

उच्च न्यायालयाची सूचना, आंतरधर्मीय जोडप्यांसाठी शासकीय अतिथीगृहात रूम्स राखून ठेवा सुरक्षेच्या कारणास्तव घर म्हणून या खोल्या राखून ठेवण्याच्या सूचना

आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे सुरक्षा धोक्यात आलेल्या जोडप्यांसाठी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात असलेली शासकीय अतिथीगृहे सुरक्षित जागा ठरू शकतात. त्यामुळे, या शासकीय अतिथीगृहातील काही खोल्या अशा जोडप्यांसाठी सुरक्षित घर म्हणून राखून ठेवण्याची सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली. उच्च न्यायालयाच्या द्विसस्यीय खंडपीठाचे न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. शिवकुमार डिगे यांनी …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचे सर्व राज्ये- प्रदेशांना आदेश, तुरुंगातील रिक्त पदांची माहिती द्या रिक्त जागा भरण्यात येत असल्यास त्याची माहिती सादर करण्याचे आदेश

सर्वोच्च न्यायालयाने आज देशातील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना तुरुंगातील अत्यावश्यक परिस्थितीची काळजी घेण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बळावर संवर्गनिहाय माहिती सादर करण्याचे आवाहन केले आहे. पुढे, सर्वोच्च न्यायालयाने रिक्त पदांची संख्या (तुरुंगातील पदांवर) आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी काही पावले उचलली गेली आहेत किंवा चालू आहेत याची माहिती मागवली. सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाचे …

Read More »

मिरारोड दंगल प्रकरण: उच्च न्यायालयाकडून १४ जणांना जामीन सर्व आरोपींना कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नाही

अयोध्येतील राममूर्ती प्राण प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला मीरा रोड येथे उसळलेल्या जातीय हिंसाचाराप्रकरणी अटकेत असलेल्या १४ तरुणांना उच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला आहे. सर्व कथित आरोपींना कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाने जामीन मंजूर करताना स्पष्ट केले. उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले की, अटकेत असलेल्या सर्व अर्जदारांचा अयोध्येतील राममूर्ती प्राण प्रतिष्ठापनेचा सोहळा …

Read More »

कुर्ला बेस्ट बस दुर्घटना प्रकरणीः चालक संजय मोरेला कोठडी चालक संजय मोरेला २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

कुर्ला बेस्ट बस दुर्घटनेप्रकरणातील बेस्ट बस चालक संजय मोरेला आज मुंबईतील न्यायालयाने २१ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. संजय मोरे विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईत कुर्ला एलबीएस मार्गावरच्या मार्केटमध्ये सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास भरधाव बेस्ट बसने अनेकांना धडक दिली. यात ७ जणांचा मृत्यू झाला तर ४८ …

Read More »

आरोपी भावेश भिंडेचा जामीन रद्द करा सरकारची उच्च न्यायालयात धाव घाटकोपर फलक दुर्घटना प्रकरणी सरकारची भूमिका

घाटकोपर फलक दुर्घटना प्रकरणातील मुख्य आरोपी आणि इगो मीडियाचा मालक भावेश भिंडेला जामीन मंजूर करण्याच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाला राज्य सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले. तसेच भावेश भिंडे यांचा जामीन रद्द करण्याची मागणी केली. त्यासोबतच राज्य सरकारने पालिका कंत्राटदार सागर कुंभारला जामीन मंजूर करण्याच्या निर्णयालाही भिंडेसह आव्हान दिले. उच्च न्यायालयालयात राज्य …

Read More »

कनिष्ठ न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाकडून रद्द २७ वर्षांपूर्वीच्या प्रकरणातून आरोपीची निर्दोष मुक्तता

जवळपास २७ वर्षांपूर्वी घडलेल्या, पुण्यातील एकाच कुटुंबातील दोन मुलांसह चार जणांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपीला कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने सोमवारी रद्द केली. उच्च न्यायालयाने पुढे सांगितले की, फाशीची शिक्षा कायम ठेवण्यासारखे हे प्रकरण नाही. त्यामुळे आरोपी भागवत बाजीराव काळे हे फाशीच्या शिक्षेसाठी पात्र ठरत नसल्याचे निरीक्षण न्या. भारती …

Read More »

बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणः १३ आरोपींना १६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मकोका न्यायालयाचा निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या १३ आरोपींना मुंबईतील विशेष न्यायालयाने (मकोका) सोमवारी १६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी १२ ऑक्टोबर रोजी मुंबई गुन्हे शाखेने प्रकरणाचा तपास हाती घेतल्यानंतर आत्तापर्यंत २६ जणांना अटक केली असून ज्यामध्ये कथित मुख्य आरोपी शिवकुमार गौतमचा समावेश …

Read More »