संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेला यंदा ६५ वर्षे पुर्ण होत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यभरात ‘महाराष्ट्र महोत्सव’ साजरा करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली. शुक्रवारी प्रदेश कार्यालयात पक्षाच्या विविध फ्रंटल व सेल राज्यप्रमुखांची बैठक प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी घेतली व पक्षाच्या प्रदेश फ्रंटल व सेलच्या राज्य …
Read More »पंकजा मुंडे यांचे आश्वासन, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योग घटकावर कारवाई करणार सना मलिक यांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिले आश्वासन
औद्योगिक प्रकल्पांनी पर्यावरणीय व सुरक्षा नियमांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. जे उद्योग घटक नियमांचे उल्लंघन करतील त्या उद्योग घटकांवर कारवाई केली जाईल, असे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी सदस्य सना मलिक यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या उत्तराच्या वेळी सांगितले. मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले की, आरएनसी प्लांटच्या संदर्भातही …
Read More »आदिती तटकरे यांची माहिती, खासगी आस्थापनात विशाखा समिती स्थापन करणे बंधनकारक करणार चित्रा वाघ यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री कु.आदिती तटकरे यांची माहिती
राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये विशाखा समिती स्थापन करण्यात आली आहे. खासगी आस्थापनात विशाखा समिती स्थापन करणे बंधनकारक करून विविध स्तरांवर आढावा घेतला जाईल असे महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी विधानपरिषदेत सांगितले. सदस्य चित्रा वाघ यांनी विशाखा समिती संबंधित उपस्थितीत केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना त्या बोलत होत्या. महिला व …
Read More »अजित पवार यांचा विरोधकांना टोला, तुमच्याकडे आमदारच नाही, १०-२० टाळकी पाठिंबा देणार का? शिवसेना उबाठाचे भास्कर जाधव यांनी टाळकी शब्दावर घेतला आक्षेप
नुकताच होळी आणि धुलवड सण उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी काँग्रेसचे नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्याकडे यावे आम्ही त्यांना आलटून पालटून मुख्यमंत्री करू असे विधान केले. तसेच बुरा ना मानो होली है असे सांगायलाही विसरले नाहीत. त्यावरून राज्यात महायुतीतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर असल्याचे …
Read More »अजित पवार, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री? आणि नाना पटोले यांची ऑफर भाजपाने नाना पटोले यांनाच दिली मंत्री पदाची ऑफर
मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदाची खुर्च्यांची आदलाबदल होताच, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सवतासुभा सुरु झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संबध तर चांगलेच ताणले गेल्याची चर्चा सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे …
Read More »शरद पवार म्हणाले, अमरावती आणि बीड मध्ये जी काही ऐकायला मिळते ते चिंताजनक काही लोकांनी सत्तेचा गैरवापर केला
मागील काही महिन्यापासून धनंजय मुंडे आणि त्यांचे विश्वासू सहकारी वाल्मिक कराड यांच्या सत्तेच्या गैरवापर करत हैदोसाच्या अनेक सुरस कथा बाहेर येत आहेत. तसेच अमरावती जिल्ह्यातूनही अशाच पद्धतीच्या घटनांची माहिती पुढे येत आहे. यापार्श्वभूमी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली. बारामतीत आयोजित एका कार्यक्रमानंतर राष्ट्रवादी …
Read More »जयंत पाटील यांची टोला, सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे बडा घर आणि पोकळ वासा महाराष्ट्र आता थांबणार.. एवढं बोलून चालणार नाही
राज्याचा अर्थसंकल्प काल अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केल्यानंतर अर्थसंकल्पावरील चर्चेला आज विधानसभेत सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे बडा घर पोकळ वासा अशी खोचक टीका करत महाराष्ट्र आता थांबणार नाही एवढं बोलून चालणार नाही असा इशाराही यावेळी देत अजित पवार …
Read More »जयंत पाटील यांची खोचक टीका, सरकारकडून सेव्हन हेवन अर्थसंकल्प; सर्वसामान्य लोकांची थट्टा गाडीतून फिरणाऱ्यांसाठी असंख्य पूल पण एसटी, रेल्वेने प्रवास करणाऱ्यांकडे दुर्लक्ष
आज राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडण्यात आला. जे गाडीतून फिरणार आहेत त्यांच्यासाठी असंख्य पूल, टनेलच्या घोषणा केल्या आहेत. पण एसटी बसने, रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य, गरीब, मध्यमवर्गीयांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याची टीका या अर्थसंकल्पावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्राची …
Read More »अर्थसंकल्पात शेतकरी, लाडक्या बहिणीसाठी कोणतीही घोषणा नाही, पण वाहनांवरील करात वाढ अर्थसंकल्पातून शेतकरी आणि लाडक्या बहिणींच्या तोंडाला पाणी
आधीच्या सर्व अर्थमंत्र्यांचे रेकॉजर्ड तोडत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा ११ व्यांदा अर्थसंकल्प मांडला. मात्र या अर्थसंकल्पातून ज्या लाडक्या बहिणींच्या मतदानाच्या जीवावर महायुती सरकार आले, त्या लाडक्या बहिणींना सत्तेवर आल्यानंतर २१०० रूपयांची घोषणा करूनही त्याची अधिकृत घोषणा अर्थसंकल्पातून केलीच नाही. तसेच राज्यातील शेतकऱ्यांवर वाढत असलेला कर्जाचा बोजा कमी …
Read More »राज्याचा वर्ष २०२५-२६ चा अर्थसंकल्प अजित पवार ११ व्यांदा मांडणार नवीन महायुती सरकारचा पहिला आणि अजित पवारांचा अकरावा अर्थसंकल्प
उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार हे उद्या सोमवार १० मार्च २०२५ रोजी राज्याचा वर्ष २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असून अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा अकरावा अर्थसंकल्प असणार आहे. अजित पवार हे आर्थिक शिस्तीचे कठोर प्रशासक म्हणून ओळखले …
Read More »