खरं तर आज रायगडमध्ये आलोय ते जनसंवाद नव्हे तर माझ्या कुटुंबातील लोकांशी संवाद साधायला आलो आहे. त्यामुळे जनसंवाद नव्हे तर कुटुंब संवाद असे म्हणायला हरकत नाही. रायगड ही सैनिकांची आणि वार करणाऱ्या वारकऱ्यांची भूमी असून गद्दारांना टकमक टोक दाखविणारे ही याच रायगड जिल्ह्यातच असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगत त्यांना डोकंच नाही त्यामुळे तर त्यांनी गद्दारी केली अशी खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांवर केली.
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील जाहिर जनसंवाद यात्रेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी वरील वक्तव्य केले.
उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की, काल झालेल्या पहिल्याच सभेमुळे महाराष्ट्रातील राजकिय वातावरण ढवळून निघाल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेच्या गद्दारांना स्वप्नातील पालकमंत्री पद मिळविण्याासाठी नवे जाकिट शिवले, कोट शिवले, पण ते आता जूने झाले. तर घाम पुसायला घेतलेले नॅपकीन घाम पुसुन पुसून ओले झाले आणि आता नवीन नॅपकीन घेण्याची वेळ आली. पण मंत्री पद काही मिळालं नाही अशी खोचक टीका शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांच्यावर केली.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, रायगड भूमी ही संताची भूमी आणि दिल्ली-आग्र्याला झुकविणाऱ्या शुरांची असल्याचे सांगत पण इथल्या गद्दारांना याची माहितीच नाही. त्यामुळेच केवळ वरच्या नेत्यांनी दिलेले आदेश पाळायचे इतकेच डोके असणाऱ्यांवर काय बोलणार असा उपरोधिक टीकाही केली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या काही जण टीका करताना म्हणत आहेत की कोरोना काळात मी दिलेल्या घोषणेनुसार माझे कुटुंब माझी जबाबदारी इथे जमलेला सैनिक हे माझे कुटुंब आहे. त्यामुळे या कुटुंबाची जबाबदारी मला घेणे गरजेचे आहे. त्यासाठीच हा समोर सगळा जमलेला उपस्थित समुदाय हा माझे कुटुंब आहे. त्यामुळेच तो इतक्या मोठ्या प्रमाणावर जमा झाला आहे. पण काही जण शासन आपल्या दारी सारखी योजना राबवून आपण कसे आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु लोकांना विचारलं तर लोक म्हणतात शासन आपल्या दारी मग चल पळ आपल्या घरी अशी टीकाही एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता केली.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आमच्यासोबत जे काही जण होते. त्यांच्यावर ईडीने धाडी टाकल्या होत्या. पण आज ते त्यांच्यासोबत गेल्यानंतर पुढे त्या धाडींचे काय झाले असा सवाल करत हीच का मोदी गॅरंटी असा सवाल करत माझा पक्ष चोरलात, चिन्ह चोरलात मग उठता-बसता काय माझ्या मागे का लागता असा सवाल करत उद्धव ठाकरे म्हणाले की, आमच्या रविंद्र वायकरांवर धाडी टाकता, त्यांना चौकशीला कार्यालयात बोलविता, मुंबई पहिल्या नागरिक राहिलेल्या किशोरी पेडणेकर यांना चौकशीसाठी बोलविता रोहित पवार यांना बोलविता पण ज्यांच्यावर जाहिर रित्या आरोप केले त्या सर्वांच्या चौकशांचे आणि पुढे काय झाले असा सवालही करत हीच का मोदी गॅरंटी आहे का असा सवालही केला.
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, यावेळी बोलताना केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ कितीजणांना मिळाला पाह्यला गेले तर एकालाही योजनांचा लाभ मिळालेला नाही. मग कसले तुम्ही भाजपाच्या विकासाचे रथ गावोगावी पाठविता असा सवाल करत या रथाला शेतकरी, तरूण, विद्यार्थी आणि कष्टकरीच विरोध करत आहे, त्या रथाला आता लोकच माघारी पाठवित असल्याची टीका करत तुमच्या बळावर माझ्यासमोर कोणीही उभा राहिला तरी त्यांच्याशी मी लढणार असा इशारा भाजपाच्या आमदार आणि गद्दार आमदारांना आवाहन आहे.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी हे काही बोलत आहे. ते केवळ सत्तेसाठी मी बोलत नसून हा देश माझा आहे, मी या देशाचा आहे. हे सगळं बोलतोय ते देश वाचविण्यासाठी बोलत आहे. जसं पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चाय पे चर्चा सुरु केली होती. तसे आपल्या शिवसैनिकांनी होऊन जाऊन दे चर्चा सारखे उपक्रम राबवित लोकांना जागे करण्याचे आवाहनही केले. जसे पूर्वी म्हणायचे रात्र वैऱ्याची आहे, पण आता दिवसही शत्रुचा राहिला आहे. त्यामुळे आपल्याला सावध राहिलं पाहिजे असे सांगत आपण जर लोकांना जागं करू शकलो नाही तर आपला उद्याचा दिवस हा रात्रीत सुरुवात होईल असा गर्भित इशाराही दिला.
#जनसंवाद । पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे । पोलादपूर, रायगड – #LIVE https://t.co/32Fexz2IEX
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) February 2, 2024