Breaking News

विशेष बातमी

पंतप्रधान मोदी यांच्या डिग्रीची माहिती मागितली म्हणून न्यायालयाने ठोठावला केजरीवालांना दंड माहिती आयोगाचा आदेश गुजरात उच्च न्यायालयाने रद्द ठरवित दिला अजब निर्णय

मागील तीन-चार वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिक्षणाचा मुद्दा राष्ट्रीय राजकारणात उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पदवी आणि पदविकेचे शिक्षण गुजरात विद्यापीठ आणि दिल्ली विद्यापाठातून झाल्याची माहिती देण्यात येत आली. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माहिती अधिकारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीची प्रत मिळावी …

Read More »

गतीमान सरकार…,च्या भ्रष्ट कारभाराची सरपंचानेच पंचायत समितीसमोर दोन लाख उधळत… मागेल त्याला विहिर योजना मंजूर करण्यासाठी १२ टक्के कमिशन शेतकऱ्यांकडे मागितल्याचा सरपंचाचा आरोप

नुकतेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या कारभारावर सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दात टिपण्णी करत वाभाडे काढले. त्यापाठोपाठ आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या सरकार गतीमान वेगवान महाराष्ट्र या घोषवाक्यातील पोकळपणा गेवराई पायगाच्या सरपंचाने उघडकीस आणली. राज्य सरकारच्या मागेल त्याला शेततळे या योजनेसाठी छत्रपती संभाजी नगरमधील फुलंब्री येथील पंचायत समितीतील कार्यालयातील …

Read More »

सरकार नंपुसकासारखं वागतंय अशी टीपण्णी करत न्यायालय म्हणाले, धर्म आणि राजकारण…. हा सारा खेळ राजकारणामुळे सुरुय

साधारणतः कोरोना काळाच्या काही महिने आधीपासून उत्तर भारतातील उत्तराखंड, उत्तर प्रदेश, नवी दिल्लीसह काही भागात हिंदूधर्मिय साधू संतांच्या विविध आखाड्याकडून एका विशिष्ट धर्मिय जनसमुदायाला लक्ष्य करणारी वक्तव्ये करत प्रक्षोभक भाषणे करण्यात आली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याविषयीची याचिका दाखल करून अशा प्रक्षोभक भाषण करणाऱ्या संघटना आणि व्यक्तींवर कारवाई करण्याचे निर्देशही केंद्र …

Read More »

तुमच्या आधार कार्डला १० वर्षे झाले? मग आता त्याचे नुतनीकरण करून घ्या मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचे आवाहन

एकाबाजूला केंद्र सरकारने आधार कार्ड आणि पॅनकार्ड एकमेकांशी संलग्नित करण्याचे आवाहन करत ३१ मार्च पर्यंत असलेल्या मुदतीत ३० जून पर्यंतची वाढ करण्याचा निर्णय आयकर विभागाने जारी केला. आता या सगळ्या घडामोडीत राज्य सरकारने ज्या नागरिकांनी आधार कार्ड काढून १० वर्षे झालेली आहेत. त्या सर्व नागरिकांनी त्या आधार कार्डाचे नुतनीकरण करून …

Read More »

स्वा.सावरकरांच्या प्रेमापायी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सह्याद्रीवर, मात्र न्यायासाठी ३ चा मंत्रालयाच्या परिसरात आत्महत्येचा प्रयत्न काल दिवसभरात एक अपंगासह दोन महिलांचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न अखेर एकीची प्राण ज्योत मालवली

राज्यात सध्या सावकरप्रेमी आणि हिंदूत्ववादी विचारसरणीचे सरकार असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सातत्याने करण्यात येत आहे. मात्र ज्या हिंदूत्ववाद्यांचे सरकार असल्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकारकडून करण्यात येतो त्याच हिंदू धर्मिय तीन व्यक्तींकडून आपल्या न्याय मागण्यांसाठी मंत्रालयासमोर काल आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यातील एका महिलेचा …

Read More »

सरन्यायाधीशांच्या त्या मुद्यावर ठाकरे गटाचा युक्तीवाद, म्हणून राज्यपालांची बेकायदेशीर कृती… राजीनामा देणं बेकायदेशीर कृत्याचा परिणाम होता

सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्ष आणि शिवसेनेतील अपात्र आमदारांच्या याचिकेवर आज सकाळी ठाकरे गटाच्यावतीने कपिल सिबल यांनी युक्तीवाद केल्यानंतर अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तीवाद केला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डि.वाय.चंद्रचूड यांनी तुम्ही म्हणता राज्यपालांचा निर्णय रद्द ठरवा आणि पूर्वीचे सरकार पुर्नःस्थापित करा. पण तुम्ही तर बहुमत चाचणीला सामोरे न जाता राजीनामाच …

Read More »

अखेरचा युक्तीवाद करताना कपिल सिबल यांचे आवाहन, जर मध्यस्थी केली नाही तर एकही सरकार… राज्यपालांचा तो निर्णय रद्द करण्याची केली मागणी

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि अपात्रतेच्या निर्णयावर ठाकरे गटाची बाजू मांडण्यास कपिल सिबल यांनी काल सकाळपासून सुरुवात केली. मात्र काल राहिलेला अर्धवट युक्तीवाद कपिल सिबल यांनी आज पूर्ण केला. यावेळी बोलताना कपिल सिबल यांनी न्यायालयाच्या जाज्वल्य इतिहासाची आठवण करून देत म्हणाले, राज्यपालांनी एकनाथ शिंदेंना सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करण्याचा घेतलेला निर्णय रद्द …

Read More »

शेतकरी-कष्टकरी रस्त्यावर तर उपमुख्यमंत्री आणि विधानसभाध्यक्ष गाण्यात दंग गायक स्व.मुकेश यांच्या कार्यक्रमाला विधानसभेचे कामकाज सुरु असताना आवारात करमणूक कार्यक्रमाचे आयोजन

राज्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तसेच शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आपला शेतमाल एकतर रस्त्यावर फेकून देत आहेत किंवा नागरीकांना फुकट वाटत आहेत. याशिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्येंच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई दरम्यान लॉगमार्च काढला असून हा मोर्चा मुंबईच्या …

Read More »

भाग ३- आरोग्य यंत्रणेतील भ्रष्ट डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा बळी ठरलेल्या गरोदर महिलेला न्याय कधी मिळणार ? सरकार सर्वसामान्यांचे कि भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्यांचे?

राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातत्याने आणि जाहिर कार्यक्रमातही हे सर्वसामान्यांचे सरकार असल्याचे सांगत मुंबईसह महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी अपघात घडला किंवा नैसर्गिक दुर्घटना घडली तर संबधित व्यक्तीच्या वारसांना तातडीने मदत जाहिर करून जखमींवर शासकिय खर्चात उपचार करण्याचे आदेश देतात. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातीलच एका रूग्णालयात एका डॉक्टरच्या …

Read More »

भाग-२: जिल्हा रूग्णालयात कोट्यावधीं रूपयांच्या करामती, फक्त पुरवठा दारांचा फायदा, शासनाचे नुकसान कॅगने सूचना करूनही अनेक गोष्टींची बिले, रजिस्टर दाखविलीच गेली नाहीत

ठाणे जिल्ह्यातील आदीवासी गावांपर्यंत योग्य ती आरोग्य यंत्रणा पोहोचली नसल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न सातत्याने निर्माण होत आला आहे. आदिवासींसह सर्वसामान्य जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात आणि त्याचा लाभ मिळावा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा म्हणून दरवर्षी कोट्यावधी रूपयांचा निधी राज्य सरकारकडून जिल्हा नियोजन समिती तर विविध योजनांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जातो. …

Read More »