Breaking News

शेतकरी-कष्टकरी रस्त्यावर तर उपमुख्यमंत्री आणि विधानसभाध्यक्ष गाण्यात दंग गायक स्व.मुकेश यांच्या कार्यक्रमाला विधानसभेचे कामकाज सुरु असताना आवारात करमणूक कार्यक्रमाचे आयोजन

राज्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तसेच शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आपला शेतमाल एकतर रस्त्यावर फेकून देत आहेत किंवा नागरीकांना फुकट वाटत आहेत. याशिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्येंच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई दरम्यान लॉगमार्च काढला असून हा मोर्चा मुंबईच्या वेशीवर पोहोचला आहे. तसेच राज्यातील जवळपास १७ लाख सरकारी-निमसरकारी कर्मचारी जून्या पेन्शच्या मागणीवर संपावर आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार आणि विधानसभा अध्यक्षांना वेळ नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे विधानसभेचे कामकाज सुरु असताना या करमणूक कार्यक्रमाला हजेरी लावल्याने उमपुमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर हे आवर्जून उपस्थित राहिल्याने हिच का सत्ताधिकाऱ्यांची तळमळ असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

शेतकरी आणि सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर चांगला पर्याय शोधण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांना योग्य सापडत नसल्याने या दोघांकडून शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या संघटनांशी चर्चेत वेळ घालविण्यात येत आहे. त्यातच सध्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधी बाकावरून सातत्याने समस्या मांडण्यात येत आहे. परंतु या समस्यां जाणून घेण्यासाठी सभागृहात विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर आणि शिंदे-फडणवीस सरकारचे कर्तेधर्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जातीने हजर राहणे आवश्यक होते. मात्र या दोघांनी विधानसभेचे कामकाज संपण्याआधीच या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली.

विशेष म्हणजे शिंदे-फडणवीस सरकार आपल्या मतदारसंघातील विकास कामांसाठी मंजूर करण्यात आलेला विकास निधी जाणीवपूर्वक थांबविला म्हणून ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी विधिमंडळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ बसून दिवसभर आंदोलन केले. मात्र या आंदोलनामुळे महाराष्ट्राची अप्रतिष्ठा होते म्हणून शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत दिला.

मात्र सद्यपरिस्थितीत राज्यातील दोन महत्वाचे घटक अडचणीत असताना आणि आपल्या न्याय मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेला असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभाध्यक्ष विधिमंडळ परिसरातच करमणूकीचा कार्यक्रम कसा करू शकतात असा सवाल यानिमित्ताने भाजपाच्या काही आमदारांनी उपस्थित केला.

अर्थसंकल्पिय अधिवेशनाला शनिवारी आणि रविवारी सुट्टी असून या सुट्टीच्या कालावधीत विधिमंडळ परिसरात किंवा सरकारी मालकीच्या एखाद्या सभागृहात गायक स्व.मुकेश यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम आयोजित करता आला असता अशी भावनाही विरोधी बाकावरील काही आमदारांनी व्यक्त केली.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *