Breaking News

स्वा.सावरकरांच्या प्रेमापायी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सह्याद्रीवर, मात्र न्यायासाठी ३ चा मंत्रालयाच्या परिसरात आत्महत्येचा प्रयत्न काल दिवसभरात एक अपंगासह दोन महिलांचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न अखेर एकीची प्राण ज्योत मालवली

राज्यात सध्या सावकरप्रेमी आणि हिंदूत्ववादी विचारसरणीचे सरकार असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सातत्याने करण्यात येत आहे. मात्र ज्या हिंदूत्ववाद्यांचे सरकार असल्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकारकडून करण्यात येतो त्याच हिंदू धर्मिय तीन व्यक्तींकडून आपल्या न्याय मागण्यांसाठी मंत्रालयासमोर काल आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यातील एका महिलेचा आज उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत आहे. मात्र सावरकर प्रेम दाखविण्याच्या राजकिय रणनीतीत व्यस्त असलेल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी काल सह्याद्री या शासकिय अतिथीगृहात खास बैठकही घेतली. परंतु मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना सर्वसामान्य जनतेच्या मागण्यांकडे लक्ष देण्यासही वेळ मिळाला नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली.

काल दुपारी १२ ते १२.३० च्या सुमारास पुणे जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्ती रमेश मोहिते यांनी अपंगाच्या अनुदानात वाढ करण्याच्या मागणीवरून स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी वेळीच दखल घेत रमेश मोहिते याचा प्रयत्न हाणून पडला. आणि त्यास तातडीने मरिन लाईन्स पोलिस ठाण्याकडे हस्तांतरीत करण्यात आले.

त्यानंतर दुपारी जवळपास १ ते १.१७ वाजण्याच्या सुमारास शितल गादेकर या महिलेने मंत्रालयात प्रवेश केला. सदरही मंत्री ६३ वर्षिय महिलेने काही दिवसांपूर्वी तिच्या मालकीची नऊ गुंठे असलेली जमिन एका व्यक्तीने हडप केल्याची तक्रार दाखल केली होती. त्या विरोधात शासन दरबारी दाद मागण्यासाठी शितर गादेकर या मंत्रालयात आल्या होत्या. त्यावेळी सदर महिला शितल गादेकर यांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी किटक नाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तात्काळ पोलिसांनी हस्तक्षेप करत सदर महिलेला जे. जे. रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान सदर महिलेचा आज मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

तसेच शितल गादेकर या मंत्रालयाच्या जवळ येण्यापूर्वीच कीटकनाशक औषध पिऊन आल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पुढे आली आहे.

त्याचबरोबर दुसऱ्या घटनेत संगीता डवरे या महिलेचे पती नवी मुंबई पोलिस दलात कार्यरत असून त्यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता या अपघातात जखमी महिलेच्या पतीवर रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यवस्थित उपचार न केल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी याबाबत तक्रार नोंदवली होती, संबंधित डॉक्टरांवर कारवाई होत नसल्याच्या कारणाने तिने काल येऊन मंत्रालया समोर आत्महत्येचा प्रयत्न केला… संगीता यांच्यावर जे जे रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Check Also

मतदान कार्ड नाही ? हरकत नाही यापैकी कोणतेही एक ओळखपत्र न्या

राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पाच टप्प्यात होणार असून १९, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *