Breaking News

आधार-पॅन लिंक करायचे राहून गेले? आता या तारखेपर्यंत लिंक करा ३१ मार्चची मुदत आता ३० जून पर्यंत वाढविली

देशातील करदात्या नागरीकांची माहिती एकाच कार्डाद्वारे उपलब्ध व्हावी या उद्देशाने केंद्र सरकारकडून पॅनकार्डधारक आणि आधार कार्डधारकांचा डेटा एकच असावा या उद्देशाना पॅन कार्डशी आधार कार्ड लिंक करण्याची मोहिम हाती घेण्यात आली. त्यासाठी आयकर विभागाने ३१ मार्च पर्यंत पॅन कार्ड आधारकार्डाशी लिंक करण्याची मुदत देण्यात आली. मात्र अद्यापही अनेक नागरिकांकडून या दोन्ही ओळखपत्र एकमेकांशी लिंक करण्यात आलेले नसल्याने ३१ मार्च पर्यंत असलेली आता ३० जून पर्यंत वाढविण्याचा निर्णय आयकर विभागाने घेतला असून यासंबधीचे पत्रकही आयकर विभागाकडून जारी करण्यात आले.

यापूर्वी आयकर विभागाने जारी केलेल्या पत्रकानुसार पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांशी लिंक केले नसेल तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यानंतर आज आयकर खात्याने पॅन कार्डशी आधार कार्ड लिंक करण्याच्या मुदतीत वाढ कऱण्याचा निर्णय जारी केला आहे. त्यानुसार ३० जून २०२३ पर्यंत आता पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक असल्याचेही आयकर विभागाने स्पष्ट केले आहे.

ज्या व्यक्तींनी आधार कार्ड पॅनशी लिंक केले नसेल त्या व्यक्तीचे पॅन कार्ड १ जुलै २०२३ पासून अवैध ठरणार आहे. तसेच पॅन कार्ड जोडले गेले नसल्याने कोणताही कर परतावा करदात्यास परत मिळणार नाही. त्याचबरोबर पॅन जोडले गेले नसल्यास कर परताव्यावरील रकमेवरील व्याज सदरच्या करदात्याला मिळणार नाही. टीडीएस आणि टीसीएसही जास्तीच्या दराने कपात करणार असा इशाराही आयकर विभागाने करदात्यांना दिला आहे.

याशिवाय पॅन कार्ड जोडले गेले नसल्याने एक हजार रूपयांचे दंडही आकारण्यात येणार असल्याचा इशारा देत आतापर्यंत ५१ लाख करदात्यांनी आपले पॅनकार्ड आधार कार्डाशी लिंक केले असल्याची माहिती आयकर विभागाने आपल्या प्रसिध्द पत्रकानव्ये दिली.

Check Also

बजाज ऑटो लिमिटेडच्या नफ्यात वाढ जाहिर केला डिव्हि़डंट नफा १८ टक्क्याने तर डिव्हीडंड ८०० टक्के

बजाज ऑटो लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीत २,०११.४३ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *