Breaking News

उध्दव ठाकरेंच्या त्या इशाऱ्यावर मुख्यमंत्री शिंदे यांचा सवाल, म्हणजे नेमके काय करणार? सावरकरांचा अपमान झाल्या तेव्हा यांचे नेते मूग गिळून गप्प

काल मालेगांव येथे झालेल्या जाहिर सभेत ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी स्वा.सावरकर प्रश्नावरून इशारा दिला. त्या इशाऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी माजी मंत्री मणिशंकर अय्यर यांचा फोटो दाखवत उध्दव ठाकरे यांना उद्देशून म्हणाले, वीर सावरकरांचा अपमान झाला तेव्हा यांचे नेते मूग गिळून गप्प होते, यापेक्षा मोठं दुर्दैव काय? कालच्या सभेत आम्ही वीर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही म्हणजे नेमकं काय करणार? हे एकदा त्यांना विचारा असा खोचक सवाल करत बाळासाहेब ठाकरेंनी मणिशंकर अय्यर यांच्या पुतळ्याला जोडे मारले होते. तशी हिंमत तुम्ही दाखवणार का? असे आव्हानही दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केले.

यावेळी पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्यासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. देशभक्तांच्या त्यागातून आणि बलिदानातून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि त्याचा उपभोग आपण सगळे घेत आहोत. लोकशाहीत प्रत्येकाला आपल्या आपल्या पद्धतीने वावरण्याचा, निर्णय घेण्याचा अधिकार मिळाला. ज्या देशभक्तांनी स्वातंत्र्य मिळवलं त्यांचा अपमान जाणीवपूर्वक केला जातो असल्याचेही म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, वीर सावरकर हे फक्त महाराष्ट्राचं दैवत नाही तर संपूर्ण देशाचं दैवत आहेत. अशा दैवताचा अपमान केला जातो आहे. जाणीवपूर्वक केला जातो आहे. विधानसभेत आपण पाहिलं की हिंदुत्व हिंदुत्व करणाऱ्यांनी राहुल गांधी यांच्याविषयी एक शब्दही काढला नाही. उलट राहुल गांधींची खासदारकी कायदेशीर मार्गाने गेली तरी काळ्या फिती लावून काँग्रेसला साथ देणारे हेच लोकं आहेत अशी टीकाही केली.

यावेळी राहुल गांधी यांना आव्हान देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राहुल गांधी यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी एक दिवस सेल्युलर जेलमध्ये राहून दाखवावं. मात्र ते तसं करणार नाहीत कारण त्यांच्याकडून ती अपेक्षाच नाही. ते सांगतात मी सावरकर नाही गांधी आहे. ते सावरकर होऊच शकत नाहीत त्यांची लायकीच नाही असं म्हणत राहुल गांधींना टीका केली. आपल्या देशाची निंदा राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही त्यांनी दुषणं दिली. आम्ही पुन्हा एकदा वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या आणि आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांचा निषेध करतो असेही ते म्हणाले.

त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले, राहुल गांधी जे बोलले त्यामुळे जनतेच्या मनात चिड आहे. मी वीर सावरकर यांच्या त्यागाविषयी मी आणखी काय सांगू ते आपल्याला माहित आहेच. जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये आणि शहरा शहरांमध्ये वीर सावरकर गौरव यात्रा आम्ही सुरू करणार आहोत अशी घोषणा केली.

Check Also

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना ४८ तास प्रचार करण्यास बंदी

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समिती (BRS) प्रमुख के चंद्रशेखर राव यांना लोकसभा निवडणुकीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *