Breaking News

खासदारकी रद्द नंतर आता लोकसभेने पुन्हा बजावली राहुल गांधी यांना नोटीस न्यायालयाच्या निकालानंतर कोणतीही संधी न देता आता घर खाली करण्याची नोटीस बजावली

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये कर्नाटकातील निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून टिप्पणी करताना सगळे चोर मोदीच का असतात? अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. यानंतर गुजरातमधील भाजपाच्या माजी आमदाराने राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत मोदी समाजाचा अपमान केल्याचा आरोप केला होता. त्यावर गुजरातमधील सूरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली. मात्र राहुल गांधी हे अपिलात न गेल्याने त्यांच्यावर तात्काळ लोकसभा सचिवलायाने खासदारकी रद्द करण्याची कारवाई केली. त्यानंतर आता लोकसभा सदनाने त्यांना खासदारकीच्या कोट्यातून मिळालेले घरही रिक्त करण्याची नोटीस बजावल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे हा राहुल गांधी यांना आणखी धक्का दिल्याचे बोलले जात आहे.

याप्रकरणी सुरतमधील सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने शिक्षा दिल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. खासदारकी रद्द केल्यानंतर राहुल गांधींना आणखी एक धक्का बसला आहे. लोकसभा हाऊस कमिटीने राहुल गांधींना नोटीस बजावली आहे. या नोटीसद्वारे राहुल गांधी यांचं शासकीय निवासस्थान रिकामा करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यामुळे राहुल गांधी यांना दिल्लीतील १२, तुगलक लेन येथील शासकीय बंगला रिकामा करावा लागणार आहे. विशेष म्हणजे सुरत न्यायालयाच्या निकालाविरोधात काँग्रेस पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी प्रलंबित असताना लोकसभा हाऊस कमिटीने राहुल गांधींना शासकीय बंगला रिकामा करण्याचा आदेश दिला.

खरं तर, कोणताही खासदार अपात्र ठरला तर लोकसभा हाऊस कमिटीकडून नोटीस दिली जाते. याचाच एक भाग म्हणून लोकसभा हाऊस कमिटीने राहुल गांधींना शासकीय बंगला रिकामा करण्याची नोटीस बजावली आहे.

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *