Breaking News

भाग-२: जिल्हा रूग्णालयात कोट्यावधीं रूपयांच्या करामती, फक्त पुरवठा दारांचा फायदा, शासनाचे नुकसान कॅगने सूचना करूनही अनेक गोष्टींची बिले, रजिस्टर दाखविलीच गेली नाहीत

ठाणे जिल्ह्यातील आदीवासी गावांपर्यंत योग्य ती आरोग्य यंत्रणा पोहोचली नसल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न सातत्याने निर्माण होत आला आहे. आदिवासींसह सर्वसामान्य जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात आणि त्याचा लाभ मिळावा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा म्हणून दरवर्षी कोट्यावधी रूपयांचा निधी राज्य सरकारकडून जिल्हा नियोजन समिती तर विविध योजनांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जातो. मात्र ठाणे जिल्हा रूग्णालयाकडून मागील वर्षभरात कोट्यावधी रूपयांची बिले बेकायदेशीररित्या मंजूर करण्यात आल्याचे आणि त्याच पैशातून विकत घेतलेल्या महागड्या वस्तूंची योग्य ती विल्हेवाट न लावता धुळखात पडून असल्याचा ठपका कॅगने २०२२ च्या अहवालात जिल्हा रूग्णालयावर ठेवला आहे.

कॅगने केलेल्या तपासणीत २०२२-२३ यावर्षाचे लेखापरिक्षण करताना भांडार शाखेतील कोट्यावधी रूपये किंमतीच्या १३ वस्तूंची यादी दिली असून या वस्तूंचा वापर केला नसल्याने त्या निरूपयोगी ठरल्याचे नमूद केले आहे. यामध्ये मेजर ओटी,एसएनसीयु, नर्सिंग ट्रेनिंग स्कूल, रेफ्रिजरेटर, कॅज्युअल्टी, ब्लॅड, बँक, सोनोग्रॅफी, आयसीयु, आय वार्ड, लॅबवर अंदाजित १ कोटी २९ लाख ६० हजार २१२ इतकी रक्कम खर्च करण्यात आली आहे. मात्र सद्यपरिस्थितीत त्या निरूपयोगी ठरल्याने इतकी मोठी रक्कम वाया गेली असल्याचा ठपका कॅगने आपल्या अहवालात नमूद केला आहे.

याशिवाय रूग्णालयाकडून १३०, ७३,०१२ किंमतीच्या ७२ वस्तू खरेदी करून त्याचे निर्लेखन न केल्याने या किंमतीच्या वस्तू ही निरूपयोगी ठरल्या आहेत. तर ६ कोटी १५ लाख ७००० हजार किंमतीच्या वस्तूंची दुरूस्ती केली नसल्याने १६ महागड्या वस्तू विनावापर पडून राहिल्याने त्या निरूपयोगी ठरल्या असल्याचेही उघडकीस आले आहे.

याशिवाय ग्रामीण रूग्णालय टोकावडे व खर्डी साठी ४३ लाख ५० हजार किंमतीचे वेस्ट ट्रिटमेंट, सिस्टीम विथ श्रडिंग अला स्टॅबिलायझिंग मशिन्स खरेदी करण्यात आली. हे साहित्य खरेदी पोहोचल्यानंतर त्याची बिले अदा करण्यात येतात. मात्र या वस्तू पोहोचल्याच्या आधीच life line pharma mumbai या कंपनीस रक्कम अदा करण्यात आली. तसेच या कंपनीला अॅडव्हॉन्स मध्ये बिल अदा करताना शासकिय नियमानुसार २ टक्के आयकर आणि २ टक्के टीडीस अर्थात मुल्यवर्धित कर कपात करणे आवश्यक असतानाही कपात कऱण्यात आला नाही. याबाबतची विचारणा करण्यात आली असता जो खुलासा भांडार शाखेने केला, तो संयुक्तीक नसल्याने याबाबत कॅगने आपला आक्षेप कायम ठेवला आहे. त्याचबरोबर टोकावडे येथील ग्रामीण रूग्णालयात सदरची मशिन बसविण्यासाठी जागा नसताना आणि तेथून कोणाची मागणी नसताना या मशिन खरेदीबाबत शंकाही कॅगने शंका उपस्थित केली.

याशिवाय हेल्थ प्लस सोल्युशन सोलापूर या कंपनीकडून ५० लाख रूपये प्रति नग किंमतीच्या स्मार्ट स्मार्ट स्कारपो मशिन्सच्या पाच नग खरेदी करण्यात आले. मात्र यापैकी दोनच मशिन्स इन्स्टॉल करण्यात आल्या आहेत. तर ३ मशिन्स इन्टॉल केल्या नसल्याचा रिपोर्ट सादर करण्यात आला नाही. तसेच मशिन्स सुरु होण्यापूर्वीच या कंपनीला ५० लाख रूपयांची रक्कम अदा करण्यात आली. तसेच ही रक्कम अदा करताना पुन्हा आयकर रक्कम आणि मुल्यवर्धित कर रूग्णालयाच्या भांडार शाखेने कपात केला नाही. बर तत्पूर्वीच शासकिय कोषागारातून १ कोटी ६९ लाख रूपये थेट संबधित वस्तूंच्या खरेदीसाठी वस्तू पोहोचण्याआधीच संबधित कंपनीला दिल्याची गंभीर बाबही या अहवाल नमूद करण्यात आली आहे. ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच या वस्तू खरेदी करण्याच्या आधीच १ कोटी ६९ लाख रूपयांचे वितरण करण्यात आल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे.

याशिवाय २०१७-१८ ते २०२१-२२ या कालावधीत १८३, ३०,५४,००० इतक्या रकमेची बिले अदा करण्यात आली आहेत. मात्र या रकमेवर शासकिय नियमानुसार आकारण्यात येणारी आयकर, जीएसटी (टीडीएस) २ टक्के कपात करण्यात आली. मात्र त्याची कागदपत्रेच कॅगला सादर केली नाहीत. त्यामुळे या रकमेचा अपहार करत शासनाची फसवणूक केल्याचे अप्रत्यक्षरित्या दिसून येते.

याशिवाय २०२० मध्ये जवळपास २५० आयव्ही स्टॅण्ड जिल्हा रूग्णालयाच्या भांडार शाखेकडून खरेदी करण्यात आली. यातील सोलापूर येथील हेल्थ केअर या कंपनीकडून २०० नग खरेदी करण्यात आले. या कंपनीकडून प्रती नग २ हजार ७९६ रूपये दराने खरेदी करण्यात आले. मात्र हिच वस्तू पुरविणारी सावी ट्रेडर्स या कंपनीकडून आय व्ही स्टँड ३ हजार ७२० रूपये अर्थात ९२३.३९ रूपये जास्त दराने खरेदी करण्यात आली. पण त्याचा अहवालही सादर केला नसल्याचा ठपका कॅगने जिल्हा रूग्णालय ठाणेवर ठेवला आहे.

कॅगने ठपका ठेवल्याची कागदपत्रे खालील प्रमाणेः

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *