Breaking News

विशेष बातमी

भाग-१: मुख्यमंत्र्यांच्या शहरातील जिल्हा रूग्णालयात मोठा आर्थिक घोटाळा, आरोग्यमंत्री-पालकमंत्री गप्पच कॅग ऑडिटमध्ये ९० हजाराची मशिन ६ लाख ६१ हजारांना विकत घेतली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहर आणि जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा चांगलीच भ्रष्टाचाराने बरबटलेली दिसून येत आहे. विशेष म्हणजे या भ्रष्टाचाराबाबत स्वतः केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या कॅगने केलेल्या ऑडिटमध्ये उघडकीस आले आहे. मात्र याबाबतचा अहवाल उपसंचालक कार्यालय आणि आरोग्य मंत्री कार्यालयास पाठवून दिल्यानंतरही त्याबाबतची कोणतीही कारवाई आरोग्य मंत्री डॉ.तानाजी …

Read More »

स्वाती मालीवालानी वडिलांवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर त्यांचे ते जुने ट्विट व्हायरल २०१६ मध्ये वडिलांचा अभिमान बाळगणाऱ्या स्वाती मालीवाल यांच्यात भूमिकेत बदल कसा

काही दिवसांपूर्वी जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी त्यांच्या वडीलांवर लैंगिक शोषणाचे आरोप केले. त्या म्हणाल्या की, त्यांच्या लहानपणी त्यांचे वडील त्यांना नेहमी मारहाण करायचे, लैंगिक शोषण करायचे. वडिलांवर असा आरोप केल्यानंतर सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू झाली. दरम्यान, मालीवाल यांचं एक …

Read More »

उच्च न्यायालयाचे आदेशः ईडी चौकशीची मागणी करणाऱ्या सोमय्यांचीच चौकशी करा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे आदेश

मागील काही वर्षापासून भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे विरोधी पक्षातील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मुख्य नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत ईडी चौकशीची मागणी करतात आणि या यंत्रणेकडून लगेच चौकशीही सुरु होत असल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील कागलचे आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी ईडीच्या कारवाई विरोधात …

Read More »

आरोग्यमंत्री डॉ.सावंतांच्या त्या घोषणेमुळे शिंदे-फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प फुटला? घोषणा करण्याच्या नादात फडणवीसांनी केले सामाजिक न्याय विभागाच्या शासन निर्णयाचे उल्लंघन

राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका कधीही जाहिर होऊ शकतात या अनुषंगाने जवळपास सर्वच राजकिय पक्षांकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर आज शिंदे-फडणवीस सरकारचा आणि अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाही हा पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर केला. मात्र साधारणतः अर्थसंकल्प सादर होण्याआधी त्यातील एखादी घोषणा जर बाहेर आली तर अर्थसंकल्प आधीच …

Read More »

अजित पवारांचा गौप्यस्फोट, लॉबीतच फडणवीसांचे स्वपक्षीयांना होते आदेश अर्थसंकल्प सुरु होताच… अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मंत्रालय आणि विधिमंडळात आयोजित पत्रकार परिषदेत दिली माहिती

राज्याचा अर्थसंकल्प आज दुपारी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केला. त्यानंतर अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया देण्यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार हे विधान भवनातील मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघात आले होते. त्यावेळी बोलताना अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सभागृहाच्या लॉबीत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या शिंदे गटाच्या शिवसेना आणि भाजपा आमदारांना दिलेल्या …

Read More »

राहुल गांधी म्हणाले, आरएसएस आणि मुस्लिम ब्रदरहूड संघटना सारखीच लंडनमधील थिंक टँक चँथम कार्यक्रमात बोलताना केली तुलना

काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या लंडनच्या दौऱ्यावर असून दोन दिवसांपूर्वीच त्यांनी चीनचं कौतुक केलं होतं आणि मोदींवर टीका केली होती. आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मुस्लीम ब्रदरहूड हे दोन्ही सारखेच आहेत असं वक्तव्य केले. त्यामुळे देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान राहुल गांधी …

Read More »

सरकार सर्वसामान्यांचे पण संकटसमयी सरकारमधील मंत्री कुठे झाले गायब? शिंदे समर्थक मंत्री ऐरवी टिव्ही दिसणारे संकटावर बोलायलाही दिसेना

राज्यात सत्तांतर होऊन जवळपास ९ महिने पूर्ण होत आले आहेत. या नऊ महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर मंत्री जाहिर कार्यक्रमातून हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार असल्याचे सातत्याने जाहिरपणे सांगत आहेत. तसेच सर्वसामान्य जनतेच्या मनातील सरकार असल्याचेही सातत्याने सांगत असतात. मात्र ऐरवी प्रतिस्पर्धी असलेल्या ठाकरे गटाच्या …

Read More »

१५० रू.त महिनाभराचे राशन बाजारात मिळते का हो? गतिमान सरकारचा सर्वसामान्यांसाठी मोठा निर्णय शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यासाठी अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय

कोरोना काळापासून संपूर्ण देशभरातील अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला आहे. त्यातच महागाईचा आगडोंब उसळलेला असतानाच अनेक सर्वसामान्य नागरीकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. तर दुसऱ्याबाजूला ८ वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातील तीन मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालाला दुप्पट भाव देण्याचे आश्वासन दिलेले असताना राज्यातील एकाही शेतकऱ्यांच्या शेतमालाला दुप्पट सोडा शेतीसाठी केलेला खर्चही मिळणे दुरापास्त …

Read More »

पुतीन यांच्या हस्ते सत्कार झालेल्या स्पुटनिक व्ही लसीच्या वैज्ञानिकांची हत्या स्पुटनिक व्ही लसीच्या वैज्ञानिक चमुत आंद्रे बोटीकोव्ह हे होते

कोरोनावरील स्पुटनिक व्ही ही रशियन लस बनवणाऱ्या वैज्ञानिकांच्या चमुतील एका वैज्ञानिकाची बेल्टने गळा आवळून हत्या करण्यात आली. आंद्रे बोटीकोव्ह असं या वैज्ञानिकाचे नाव आहे. याप्रकरणी २९ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली असून घरगुती वादातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. रशियन मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ४७ वर्षीय आंद्रे बोटीकोव्ह हे गमलेया …

Read More »

न्यायालयाचे आदेश, आयुक्त नियुक्तीसंदर्भात नवा कायदा, तोपर्यंत या समितीच्या… सर्वोच्च न्यायालयाच्या पध्दतीप्रमाणे कोलेजियम पध्दत अवलंबण्याचे निर्देश

मागील काही वर्षांमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्तांच्या भूमिकेसंदर्भात आणि त्यांच्या निवडीसंदर्भात भाजपा वगळता सर्वच राजकिय पक्षांकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे. त्यातच विद्यमान केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी शिवसेनेप्रश्नी दिलेल्या निकालामुळे आयुक्तांच्या हेतू विषयी नव्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले. यापार्श्वभूमीवर निवडणूक आयुक्तांच्या नेमणूकीसंदर्भातील याचिकेवरील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल देत निवडणूक …

Read More »