Breaking News

पुतीन यांच्या हस्ते सत्कार झालेल्या स्पुटनिक व्ही लसीच्या वैज्ञानिकांची हत्या स्पुटनिक व्ही लसीच्या वैज्ञानिक चमुत आंद्रे बोटीकोव्ह हे होते

कोरोनावरील स्पुटनिक व्ही ही रशियन लस बनवणाऱ्या वैज्ञानिकांच्या चमुतील एका वैज्ञानिकाची बेल्टने गळा आवळून हत्या करण्यात आली. आंद्रे बोटीकोव्ह असं या वैज्ञानिकाचे नाव आहे. याप्रकरणी २९ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली असून घरगुती वादातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

रशियन मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ४७ वर्षीय आंद्रे बोटीकोव्ह हे गमलेया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर इकोलॉजी अॅण्ड मॅथेमॅटिक्स येथे वरिष्ठ संशोधक म्हणून काम करत होते. गुरुवारी ते त्यांच्या मॉस्को येथील घरात आराम करत असताना संशयित आरोपी तिथे आला. यावेळी काही घरगुती कारणांवरुन दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीने रागाच्या भरात आंद्रे बोटीकोव्ह यांची बेल्टने गळा आवळून हत्या केली.

याप्रकरणी मॉस्को पोलिसांनी एक निवेदन जारी केले आहे. २९ वर्षीय संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून त्याने हत्येची कबुली दिली असल्याचे या निवेदनातून सांगण्यात आले आहे. तसेच त्याच्यावर यापूर्वीसुद्धा हत्येचा गुन्हा दाखल असल्याची माहिती निवदेनाद्वारे देण्यात आली आहे.

स्पुटनिक व्ही लस बनवणाऱ्या १८ वैज्ञानिकांच्या चमूमध्ये बोटीकोव्ह यांचा समावेश होता. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी २०२१ मध्ये त्यांचा सत्कारही केला होता. कोरोनावरील लस तयार करण्यासाठी दिलेल्या योगदानासाठी त्यांचा सत्कार करण्यात आला होता.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *