Breaking News

Tag Archives: corona vaccine

पुतीन यांच्या हस्ते सत्कार झालेल्या स्पुटनिक व्ही लसीच्या वैज्ञानिकांची हत्या स्पुटनिक व्ही लसीच्या वैज्ञानिक चमुत आंद्रे बोटीकोव्ह हे होते

कोरोनावरील स्पुटनिक व्ही ही रशियन लस बनवणाऱ्या वैज्ञानिकांच्या चमुतील एका वैज्ञानिकाची बेल्टने गळा आवळून हत्या करण्यात आली. आंद्रे बोटीकोव्ह असं या वैज्ञानिकाचे नाव आहे. याप्रकरणी २९ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली असून घरगुती वादातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. रशियन मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ४७ वर्षीय आंद्रे बोटीकोव्ह हे गमलेया …

Read More »

कोरोनाबाबत पंतप्रधान मोदींनी दिला हा गंभीर इशारा… संसर्ग आजार अद्याप गेला नसल्याने काळजी घेण्याचे आवाहन

महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाची तिसरी लाट येवून गेल्यानंतर जवळपास सर्वच राज्यांनी कोरोनापासूनच्या बचावासाठीचे नियमावलीतून सूट दिली. तसेच अनेक गोष्टींवरील निर्बंध उठवून टाकले. तर परदेशातील अनेक देशांमध्ये विशेषत: चीनसह इतर काही देशांमध्ये कोरोनाचे नवीन व्हेरिएंट आढळून आल्याने काही देशांनी खबरदारीचा उपाय म्हणून काही देशांनी निर्बंध जारी करण्याची तयारी केलेली असताना आज एका …

Read More »

लाल गहू मागणारा भारत आज मोदींमुळे साठ सत्तर देशांना कोरोना लस निर्यात करतोय भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची काँग्रेसवर उपरोधिक टीका

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले आहे. सामुहिक बलात्कारासारख्या घटनांचेही या सत्ताधारी आघाडीला काही वाटत नाही, इतके हे सरकार संवेदनाशून्य झाले आहे. भारतीय जनता पार्टी प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करत असून आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र संघर्ष करा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. भाजपा …

Read More »

कोरोना लस निर्मितीसाठी हाफकिनला प्रतिक्षा केंद्राच्या निधीची राज्य सरकारकडून निधीची तरतूद मात्र केंद्राचे निधीबाबत कोणतेच उत्तर नाही

मुंबईः विशेष प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांवरील लस निर्मितीचा येणारा ताण कमी करण्यासाठी भारत बायोटेकने तयार केलेली कोव्हॅक्सीन (Covaxin) लस हाफकिन इन्स्टीट्युटमध्ये निर्मिती करण्यास उशीरा का होईना कोविड सुरक्षा योजनेतंर्गत परवानगी दिली. त्यासाठी केंद्र- राज्याच्या हिश्शाने १५४ कोटी रूपयांचा प्रकल्प खर्च तयार करण्यात आला. परंतु …

Read More »

बेरोजगारांसाठी खुषखबर! १५ हजार ५११ रिक्त पदे एमपीएससी मार्फत भरणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात विविध विभागांमध्ये १५ हजार ५११ अ, ब, क वर्गातील जागा रिक्त असून या सर्व जागा एमपीएससी आयोगाच्या मार्फत लवकरच भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत करत एसईबीसी उमेदवारांसाठी वयोमर्यादा वाढविण्यात आल्यामुळे उमेदवारांच्या जास्तीची नोकरी सेवा करता …

Read More »

केंद्रामुळे महाराष्ट्राला लस पुरवठा करण्यास कंपन्यांचा नकार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी देशातील दोन कंपन्या सोडून जगातल्या बर्‍याच कंपन्यांनी थेट राज्यांना लस देण्यास नकार दिला आहे. मात्र देशाची एक पॉलिसी ठरवावी आणि लसीची अंमलबजावणी करा अशी मागणी आधीपासूनच करत होतो. त्यामुळे आतातरी केंद्राने एक राष्ट्रीय पॉलिसी तयार करून ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि …

Read More »

कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार अपयशी आणि हतबलही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी आजच्या घडीला देशामध्ये दरदिवशी ४ लाख कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. ही कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहेच, शिवाय हतबलही झाल्याचे चित्र पाहायला मिळत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने कोरोना परिस्थितीसंदर्भात आदेश देऊन केंद्र सरकारला …

Read More »

स्वतंत्र लस खरेदी करण्यास महाराष्ट्राला परवानगी द्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना पत्र

मुंबई: प्रतिनिधी तिसऱ्या कोरोना लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या लाटेचा सामना करण्यापूर्वी राज्यातील नागरीकांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण योजना राबवायची आहे. महाराष्ट्राला आवश्यक लागणाऱ्या लसींची एकदमच खरेदी करण्याचा विचार असून त्यादृष्टीने राज्यांनां स्वतंत्र लस खरेदी करण्याची परवानगी दिल्यास लसीकरण मोहिम अधिक सक्षमपणे राबविणे शक्य होणार असल्याने सध्याच्या दोन लस उत्पादक …

Read More »

लस उपलब्ध झाली तरच लसीकरण १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी लसींची उपलब्धता हे आव्हान- आरोग्यमंत्री टोपे

मुंबई : प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात आज महाराष्ट्राने मैलाचा दगड रोवत दीड कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. याबद्दल आरोग्य यंत्रणनेचे अभिनंदन करतानाच दररोज ८ लाख लसीकरणाचे राज्याने उद्दिष्ट ठेवले असून त्याचा लसींचा पुरवठा वेळेवर व्हावा, अशी मागणी केंद्र शासनाकडे केल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील …

Read More »

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी महाराष्ट्राचे केंद्राच्या एक पाऊल पुढे लस आणि रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी जागतिक निविदा काढण्याची उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई: विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशात कोरोनाचे रूग्ण वाढत असताना भाजपाशासित आणि बिगर भाजपाशासित राज्यांमध्ये केंद्रातील मोदी सरकारकडून दुजाभाव करण्यात येत माहिती पुढे येत असतानाच आता राज्यातील कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीने केंद्राच्या मदतीवर विसंबून न राहता थेट आंतरराष्ट्रीय पातळीवरून लस आणि रेमडेसिवीरची खरेदी करण्याची तयारी सुरु केली. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी …

Read More »