Breaking News

राहुल गांधी म्हणाले, आरएसएस आणि मुस्लिम ब्रदरहूड संघटना सारखीच लंडनमधील थिंक टँक चँथम कार्यक्रमात बोलताना केली तुलना

काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या लंडनच्या दौऱ्यावर असून दोन दिवसांपूर्वीच त्यांनी चीनचं कौतुक केलं होतं आणि मोदींवर टीका केली होती. आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मुस्लीम ब्रदरहूड हे दोन्ही सारखेच आहेत असं वक्तव्य केले. त्यामुळे देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर विश्व हिंदू परिषदेचे टीका केली.

लंडनमधल्या थिंक टँक चॅथम हाऊसमध्ये सुरू असलेल्या चर्चेत राहुल गांधी यांनी हे बोलत होते. त्यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केले.

यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची स्थापना अशा पद्धतीने करण्यात आली आहे जशा पद्धतीने इजिप्तमध्ये मुस्लीम ब्रदरहूड स्थापन झालं होतं. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ अर्थात आरएसएस ही कट्टर आणि फॅसिस्टवादी संघटना आहे. या संघटनेने भारतातल्या काही संस्थांवरही कब्जा केला आहे. ज्याप्रमाणे इजिप्तमध्ये मुस्लीम ब्रदरहूड आहे त्याप्रमाणे भारतात आरएसएस आहे. भारतात या संघटनेकडून असा प्रचार केला जातो आहे की भाजपाला कुणी हरवू शकत नाही.

राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर विश्व हिंदू परिषदेने राहुल गांधींवर टीका केली आहे. महामंत्री सुरेंद्र जैन यांनी टीका करताना म्हणाले की, राहुल गांधी हे आपल्या स्वार्थासाठी देशाचे तुकडे करू इच्छित आहेत. राहुल गांधी यांचं वर्तन हे एखाद्या टूलकिट प्रमाणे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक राष्ट्रभक्त आहेत. त्यांची तुलना मुस्लीम ब्रदरहुडशी करणं पूर्णपणे चुकीचं आहे असा खुलासा केला.

ब्रदरहूड संघटना म्हणजे नेमकी काय?

इजिप्तमध्ये १९२८ मध्ये सुन्नी नेता हसन अल बन्नाने इस्लामी देशाची मागणी करण्यासाठी मुस्लीम ब्रदरहूड ही संघटना स्थापन केली. बन्ना इजिप्तच्या एका शाळेत शिक्षक होते आणि ते इमामही होते. त्यावेळी बन्ना यांनी राजेशाही शासनाच्या समोर अर्थव्यवस्था आणि समाजाचं इस्लामीकरण हे केलं जावं अशी मागणी केली. मात्र त्यांचा प्रस्ताव धुडकावण्यात आला.

सरकारने त्यांची मागणी धुडकावल्यानंतर हिज्ब इल इखवान अल मुस्लिमीन यांच्या मदतीने इजिप्तमध्ये एक चळवळ चालवली गेली. या चळवळीचा उद्देशच हा होता की कुराण आपला कायदा आहे हे लोकांना समजावं. तसंच जिहाद हाच आपला मार्ग आहे असंही या चळवळीत ध्वनित केलं गेलं. त्यानंतर मुस्लिम ब्रदरहूडची स्थापना झाली. १९४० मध्ये या संघटनेसोबत ५ लाख लोक जोडले गेले. इस्रायल सोबत युद्ध पुकारलं गेल्यानंतर मुस्लिम ब्रदरहूडने पॅलेस्टाईनला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले. एवढंच नाही इजिप्तमध्ये अंतर्गत युद्ध सुरू करण्यामागेही मुस्लीम ब्रदरहूडच असल्याची माहिती पुढे आल्यानंतर सरकारने अॅक्शन मोड मध्ये येत या संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या करत शेकडो कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकले.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *