Breaking News

सरकार सर्वसामान्यांचे पण संकटसमयी सरकारमधील मंत्री कुठे झाले गायब? शिंदे समर्थक मंत्री ऐरवी टिव्ही दिसणारे संकटावर बोलायलाही दिसेना

राज्यात सत्तांतर होऊन जवळपास ९ महिने पूर्ण होत आले आहेत. या नऊ महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर मंत्री जाहिर कार्यक्रमातून हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार असल्याचे सातत्याने जाहिरपणे सांगत आहेत. तसेच सर्वसामान्य जनतेच्या मनातील सरकार असल्याचेही सातत्याने सांगत असतात. मात्र ऐरवी प्रतिस्पर्धी असलेल्या ठाकरे गटाच्या आणि विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी सतत बूम दिसला की बोलायला पुढे पुढे करणारे सर्वसामान्य सरकारमधील मंत्री मात्र सर्वसामान्य जनतेच्या संकटसमयी मात्र गायब झाल्याचे दिसून येत असून सर्वसामान्यांच्या मनातील सरकारचे मंत्री संकटावेळी कुठे गायब झाले? असा सवाल सर्वसामान्य जनतेकडून विचारण्यात येत आहे.

सत्तांतरानंतर सध्याच्या विद्यमान सरकारला मार्च महिन्यात नववा महिना सुरु झालेला असतानाच सर्वसामान्य जनतेशी संबधित दोन मोठ्या घटना घडल्या. सर्वसामान्य जनतेच्या पाल्यांच्या भवितव्याशी निगडीत १० वी परिक्षेच्या काळात कॉपीमुक्त अभियानाची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मोठ्या थाटात घोषणा केली. मात्र या अभियानाचा फज्जा उडाल्यानंतर ठिकठिकाणी कॉपीचे प्रकार आढळून आल्यानंतरही त्याबाबत चकार शब्द शालेय शिक्षण विभागाकडून काढण्यात आला नाही.

त्यानंतर १२ व परिक्षा सुरु झाल्यानंतर इंग्रजी भाषेच्या प्रश्नपत्रिकेत मोठा गोंधळ झाल्याचे दिसून आले. तर गणिताचा पेपर परिक्षा सुरु होण्याच्या अर्धातास आधीच फुटला. या घटनेबाबत विधानसभेत विरोधी पक्षनेत्यांनी शुक्रवारी उपस्थित केला. तर शालेय शिक्षण मंत्रीच सभागृहात गैरहजर शेवटी भाजपाचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सामुहिक मंत्रिमंडळाची जबाबदारी म्हणून या घटनांबाबत संध्याकाळपर्यंत निवेदन करण्याचे आश्वासन दिले. पण संभागृहाचे कामकाज संपल्यानंतर त्याबाबतचे निवेदन शिंदे-फडणवीस सरकारने जारी केले.

बरं त्यातच काही ठिकाणी पेपर वेगळ्या विषयाचा आणि विद्यार्थ्यांना दिला सीबीएससी पॅटर्नचा भलत्याच विषयाचा पेपर याबाबत विद्यार्थ्यांनी दस्तुरखुद्द तक्रार करूनही त्याबाबत कोणतेही कारवाई न करता विद्यार्थ्यांना तसाच पेपर द्यायला लावण्याची घटना उघडकीस येऊनही ना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि शालेय शिक्षण विभागाने कोणताही खुलासा केला.

याशिवाय राज्यातील सर्वसामान्य जनता या घटकांमध्ये मोडणाऱ्या शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेले पीक अवकाळी पावसामुळे पुरते नष्ट झाले. बर हा अवकाळी पाऊत सर्वसामान्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये पडून हजारो हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागणार आहे. या मोठ्या संकट संमयी मराठवाड्यात राहणारे कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे काही सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्याचे किंवा त्या अनुषंगाने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्याचे कृषी विभागाकडून आढळून आले नाही.

दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातील जळगांवचे पालकमंत्री गिरीष महाजन हे अवकाळी पाऊसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान पाहण्यासाठी किमान शेतीच्या बांधावर गेल्याचे दिसून आले. परंतु ते जळगांव पुरतेच.

त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या तोंडी नाव सर्वसामान्यांचे पण सर्वसामान्यांचे विद्यार्थी आणि शेतकऱ्यांच्या संकटसमयी दिलासा देण्यासाठीही धावून गेले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य सरकारचे मंत्री संकट समयी कुठे गायब झाले? असा सवाल सर्वसामान्य जनतेकडूनच विचारण्यात येत आहे.

Check Also

केंद्रीय निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदी यांना दिली आचारसंहितेतून सूट?

एखाद्या मतदारसंघातील किंवा राज्यातील विधिमंडळ अथवा संसदेच्या लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर झाल्यानंतर त्या त्या राज्याच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *