Breaking News

स्वाती मालीवालानी वडिलांवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर त्यांचे ते जुने ट्विट व्हायरल २०१६ मध्ये वडिलांचा अभिमान बाळगणाऱ्या स्वाती मालीवाल यांच्यात भूमिकेत बदल कसा

काही दिवसांपूर्वी जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी त्यांच्या वडीलांवर लैंगिक शोषणाचे आरोप केले. त्या म्हणाल्या की, त्यांच्या लहानपणी त्यांचे वडील त्यांना नेहमी मारहाण करायचे, लैंगिक शोषण करायचे. वडिलांवर असा आरोप केल्यानंतर सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू झाली. दरम्यान, मालीवाल यांचं एक जुनं ट्विट भलतचं व्हायरल होत असून मालीवाल यांच्या दुटप्पी भूमिकेवरून समाजमाध्यमांतून मालीवाल यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात येत आहे.

मालीवाल यांनी म्हटलं होतं की, माझे वडील माझं लैंगिक शोषण करायचे, मारहाण करायचे. वडिलांच्या भितीने मी तासनतास खाटेखाली लपून बसायचे. परंतु या आरोपांनंतर त्यांचं एक जुनं ट्विट चर्चेत आले. या ट्विटमध्य त्यांनी म्हटलं होतं की, त्यांचे वडील एक सैनिक आहेत.
व्हायरल होत असलेल्या ट्विटमध्ये स्वाती मालीवाल यांनी लिहिलं आहे की, मी एका सैनिकाची मुलगी आहे. मी देखील त्याच वातावरण वाढले आहे. देशासाठी काम करणं आणि देशासाठी मरणं हेच मी शिकले आहे. जगातली कोणतीही ताकद मला घाबरवू शकत नाही. त्यांचं हे ट्विट ट्विटरवर @Prakharshri78 (प्रखर श्रीवास्तव) या युजरने शेअर केले.

ट्विटर युजर प्रखर श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे की, तुम्ही तुमच्या पित्यावर लैंगिक छळाचे आरोप करत आहात. मग २०१६ पर्यंत ज्या पित्याचा तुम्हाला अभिमान होता ते कोण होते. मला विश्वास आहे की, कोणतीही मुलगी आपल्या पित्याबद्दल खोटं बोलणार नाही. परंतु यातलं खोटं काय आहे? तुम्हाला उत्तर द्यावं लागेल कारण तुम्ही जगातल्या सर्वात पवित्र नात्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *