Breaking News

शेतकरी-कष्टकऱ्यांचे लाल वादळ मुंबईच्या दिशेनेः विधानभवनाला घालणार घेराव नाशिक ते मुंबई लॉग मार्च, मंत्री दादाजी भुसे भेटणार मोर्चाच्या प्रतिनिधींना

मागील काही दिवसांपासून राज्यातील शेतकऱ्यांना त्यांनी कष्टातून पिकविलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, तसेच थकित वीजबीलामुळे शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडण्यात येत आहे, त्यातच अवकाळी पाऊसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला. या सगळ्या संकटाच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारने तात्काळ मदत जाहिर करणे अपेक्षित असताना आणि विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले असतानाही केवळ वेळ काढूपणाचे धोरण सरकारकडून स्विकारले जात आहे. पार्श्वभूमीवर डाव्या पक्षांच्या किसान सभेच्यावतीने शेतकरी, कष्टकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला आहे. हा मोर्चा उद्या मुंबईत पोहचण्याची शक्यता आहे. तसेच शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर योग्य तोडगा न निघाल्यास या मोर्चेकरांकडून विधानभवनाला घेराव घालण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

यो मोर्च्येकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी मंत्री दादाजी भुसे हे आज संध्याकाळी भेटणार असल्याची माहिती पुढे येत आहे. या चर्चे दरम्यान सर्वमान्य तोडगा निघाल तर मोर्चा थांबविण्यात येईल अन्यथा विधान भवनाला घेराव घालणार असल्याचा इशारा डाव्या पक्षांनी दिला आहे.
त्याचबरोबर चर्चे दरम्यान राज्य सरकारकडून जर लेखी आश्वासन दिले तरच मोर्चा पुढे न्यायचा की नाही याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही मोर्चेकऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अवकाळी पाऊसामुळे राज्यातील १३ हजार हेक्टर जमिनीवरील उभी पिके भूईसपाट झाली आहेत. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर मोठा डोंगर कोसळला आहे. त्यातच शेतकऱ्यांची नगदी पिके असलेल्या कांदा, द्राक्षे, कापूस, कडधान्य यासह अनेक पिके निर्यातीला परवानगी मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांना आपले उत्पादने रस्त्यावर फेकून देण्याची पाळी आली आहे. तर शेतकऱ्यांच्या आत्मत्यांच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. त्यामुळे शेतकरी-कष्टकऱ्यांनी पुन्हा एकदा लाँग मार्च काढण्यात आला आहे.

Check Also

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *