Breaking News

त्या व्हिडिओ प्रकरणी शीतल म्हात्रे म्हणाल्या, भावा-बहिणीचे नाते असलेल्या… दहिसर पोलिसांनी केली व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई

दहिहंडी उत्सवानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्त्ये आले तर त्यांना जशास तसे उत्तर द्या, वेळ पडल्यास त्यांचे त्यांची तगडी तोडा असे वादग्रस्त वक्तव्य करत प्रसिध्दीच्या झोतात आलेले दहिसरचे शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांची समाज माध्यमांवर मॉर्फ केलेली चित्रफीत प्रसारीत केल्याप्रकरणी दहिसर पोलिसांनी दोघांना अटक केली. शीतल म्हात्रे यांच्या तक्रारीवरून दहिसर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

अशोक मिश्रा व मानस कुवर अशी अटक आरोपींची नावे आहेत. दहिसर पोलीस ठाण्यात विनयभंग व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदयांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकृष्णनगर परिसरात शनिवारी रात्री विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. त्यावेळी श्रीकृष्णनगर येथून अशोकवन जंक्शन, दहिसर पूर्व, मुंबईपर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. अशोकवन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. याचे आयोजन मागाठाणे मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्याकडून करण्यात आले. त्या कार्यक्रमातील रॅलीतील ती चित्रफीत मॉर्फ करुन व्हायरल करण्यात आल्याने शीतल म्हात्रे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

या चित्रफीतीबाबत शीतल म्हात्रे यांनी ट्वीट करत भूमिका स्पष्ट केली. राजकारणामधील महिलेसंदर्भात बोलण्यासारखे काही नसले तर तिचे चारित्र्यहनन करणे हेच उद्ध्वस्त गटाचे संस्कार आहेत? मातोश्री नावाच्या फेसबूक पेजवरुन एका स्त्री संदर्भात असा मॉर्फ व्हिडीओ अपलोड करताना बाळासाहेबांचे संस्कार नाही का आठवले? हे व्हिडीओ व्हायरल करणारे कोण आहेत हे सर्वांना माहिती आहे. विरोधक एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ शकतात. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात एखाद्या स्त्रिला अशा पद्धतीने बदनाम करू शकतात. भावा-बहिणीचे नाते असलेल्या एखाद्या स्त्री-पुरुषाला समाज विकृत नजरेने बघतो आहे. यामागे कुणाचे डोके आहे आणि कोण करते आहे याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे, अशी प्रतिक्रियाही शीतल म्हात्रे यांनी व्यक्त केली.

Check Also

दृष्टिबाधित व्यक्तींसाठी समावेशक ॲटलासचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

दिव्यांग व्यक्तींना देशाच्या सामाजिक, आर्थिक प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी सक्षम करणे आवश्यक आहे. दिव्यांगांना शिकविण्यात येणारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *