Breaking News

ठाकरेबरोबरील शत्रुत्व इतके की लटकेंच्या शपथविधीला दोन्ही सभागृहाचे नेतेच गैरहजर

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या मदतीने राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. या बंडखोरीवरून शिंदे-भाजपावर ठाकरे गटासह इतर राजकिय पक्षांकडूनही टीका करण्यात येत आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार आणि उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर मोठ्या प्रमाणावर संबध ताणले गेले. या संबध सुधारण्याऐवजी आणखीनच बिघडत चालले आहेत. त्या अनुषंगाने नुकतीच एक घटना विधिमंडळात घडली.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर राज्य विधिमंडळाच्या विधानसभेचे गटनेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली. तर विधान परिषदेचे गटनेते म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. साधारणपणे एखाद्या आमदाराच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर जेव्हा नवा आमदार निवडूण येतो. त्यावेळी त्या आमदाराच्या शपथविधीला साधारणत विधानसभेचे गटनेते आणि विधान परिषदेचे गटनेते हजर राहतात आणि विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांना शुभेच्छाही देतात. मात्र शिंदे-फडणवीस सरकारचे राज्य विधिमंडळातील विधानसभेचे नेते आणि विधान परिषदेतील नेते हे दोघेही गैरहजर राहीले. राज्य विधिमंडळाच्या संकेतानुसार या दोन्ही सभागृहाच्या नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक असल्याची माहिती विधिमंडळातील सूत्रांनी दिली.

मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिंदे-फडणवीस यांचे उध्दव ठाकरे यांच्याशी संबध कमालीचे ताणले गेले. आणि या संबधातील तणाव कमी करण्यासाठी शिंदे गट आणि भाजपाकडून आतापर्यंत कोणतेही पाऊले उचलण्यात आलेली नाहीत. यापार्श्वभूमीवर राज्यात शिंदे-फडणवीस सरकारने सत्ता स्थापनेच्या नादात निखळ राजकिय संबध ठेवण्याच्या प्रथेलाच तिलांजली देण्याचे ठरविले असल्याचे दिसत आहे. ऋतुजा लटके यांच्या शपथविधीला दोन्ही सभागृहाचे गट नेते गैरहजर राहिल्याने पक्षांमध्ये असलेला तणाव आता नवनियुक्त आमदारांना वैयक्तिक पातळीवरही उतरला असल्याचा नवा पायंडा शिंदे-फडणवीस सरकारने पाडला असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे.

दरम्यान, नवनिर्वाचित विधानसभा सदस्या ऋतुजा रमेश लटके यांना विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली. विधान भवनात झालेल्या या शपथविधी समारंभास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी मंत्री तथा विधानपरिषद सदस्य ॲङ अनिल परब, विधानसभा सदस्य सुनिल प्रभू आदी उपस्थित होते.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *