Breaking News

ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या मित्राची अध्यक्ष पदी वर्णीः साक्षी मलिक यांनी घेतली निवृत्ती

देशात ब्रिटीशकालीन मानसिकतेतून बाहेर पडत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहिर करत नव्या संसद इमारतीच्या सेंट्रल व्हिस्टाचे विधिवत हिंदू रितू रिवाजाप्रमाणे उद्घाटन केले. नेमके त्याच दिवशी नवी दिल्लीतील जंतर मंतर येथील रस्त्यावर कुस्ती पटू आणि ऑलिंपिक विजेत्या महिला कुस्तीगीरांनी भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांनी लैगिंक शोषण केल्याचा आरोप महांघाच्या अध्यक्ष पदावरून हटविण्याची मागणी केली. मात्र अखिल भारतीय कुस्ती महासंघाच्या आज झालेल्या निवडणूकीत ब्रिजभूषण शरण सिंग यांचे मित्र आणि व्यावसायिक भागीदार संजय सिंग विजयी झाले. त्यामुळे आपण कुस्ती खेळ कधीही खेळणार नाही अशी घोषणा ऑलंम्पिक पदक विजेत्या साक्षी मलिक यांनी केली.

दिल्लीतील प्रेस क्लब ऑफ इंडिया येथे आयोजित पत्रकार परिषदेत साक्षी मलिक बोलत होत्या. यावेळी बजरंग पुनिया फोगट विग्नेष उपस्थित होते.

साक्षी मलिक पुढे बोलताना म्हणाल्या, महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण करणाऱ्या ब्रिजभूषण शरण सिंग व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करावा आणि त्याला संसदेतून बडतर्फ करावे, अखिल भारतीय संघाच्या अध्यक्ष पदावर हटवावे या मागणीवरून आम्ही आंदोलन पुकारले. मात्र आज अखिल भारतीय कुस्ती महासंघाच्या झालेल्या निवडणूकीत ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या सारखेच असलेले मित्र आणि त्यांचे व्यावसायिक भागीदारी हे जर विजयी झाले तर आम्ही कुस्ती खेळ खेळणार नाही असे जाहिर केले. मात्र तोपर्यंत कुस्ती महासंघ अध्यक्ष पदाच्या निवडणूकीचा निकाल जाहिर होताच. कुस्ती खेळ आपण कधी खेळणार नाही असे जाहिर करत आपण निवृत्ती घेत असल्याचे जाहिर केले.

https://twitter.com/SakshiMalik/status/1737803756069167542

तसेच साक्षी मलिक म्हणाल्या, आम्ही सुरु केलेल्या आंदोलनाला देशाच्या कानाकोपऱ्यातून येऊन ज्यांनी पाठिंबा दिला, त्या ज्ञान अज्ञात व्यक्तींचे आभार मानत आमच्या आंदोलनाला पाठिंबा देताना ज्यांना एक वेळचे खायचे वांदे होते अशा महिला आणि कुटुंबांनी आम्हाला पाठिंबा दिला. त्या सर्वांचे आभार मानले.

यावेळी विग्नेष फोगट आणि बजरंग पुनिया आदीही उपस्थित होते. मात्र ऑलम्पिंक विजेत्या साक्षी मलिक यांना आपली भूमिका जाहिर करताना अश्रू अनावर होत होते. साक्षी मलिक यांनी रडत रडतच कुस्ती कधीही खेळणार नसल्याचे जाहिर केले.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *