Breaking News

मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, उपराष्ट्रपतींचा अपमान सहन करणार नाही…

तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी संसद भवन परिसरात उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती जगदीप धनकड यांचा अवमान करणारे असभ्य वर्तन केले आणि खासदार राहुल गांधी यांनी त्याचे चित्रण केले. सदर घटनेचा प्रखर विरोध करण्यासाठी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली भारतमाता सिनेमा ते लालबाग पोलीस स्टेशन परिसरात मोर्चा काढण्यात आला. या नंतर काळाचौकी पोलीस स्टेशन मध्ये जनतेच्या भावना दुखावल्याबद्दल खासदार कल्याण बॅनर्जी आणि राहुल गांधी यांच्या विरुद्ध पोलीस तक्रार देखील करण्यात आली. या वेळी उपस्थितांन कडून दोषी खासदारांच्या निलंबनाची मागणी उचलून धरण्यात आली.

प्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलतांना मंगलप्रभात लोढा म्हणाले, ” जगदीप धनकड यांचा झालेला अपमान हा व्यक्तिगत नसून संविधानिक पदाचा आणि पूर्ण राष्ट्राचा अपमान आहे. कल्याण बॅनर्जी आणि राहुल गांधी यांनी समजून उमजून केलेला हा अवमान असून भारताची प्रतिमा संपूर्ण विश्वात मालिन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या विरोधात संपूर्ण भारतात संतापाची लाट आहे आणि सदर कृत्याचा विरोध करण्यासाठीच आम्ही देखील येथे जमलो आहोत. इथे सर्वच निलंबनाची मागणी करत आहेत पण फक्त तेवढे पुरेसे नाही, यावर कायदेशीर कारवाई व्हायला हवी. जेणेकरून यापुढे अशी कोणतीही घटना होणार नाही.”

 

Check Also

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातातील मृतांना ५ लाखांची मदत जखमींवर मोफत उपचार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

डोंबिवली (घेसरगाव) येथून खासगी बसने पंढरपूर येथे निघालेल्या वारकरी भक्तांच्या वाहनाला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *