Breaking News

Tag Archives: mangalprabhat lodha

कोस्टल रोडच्या परिसरात जागतिक दर्जाचे पार्क उभे करणार

धर्मवीर संभाजी महाराज मुंबई सागरी रस्ता म्हणजेच मुंबई कोस्टल रोडच्या परिसरात ३२० एकर जागतिक दर्जाचे पार्क उभे केले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. सागरी किनारा रस्त्यासह मुख्यमंत्री शिंदे यांनी वरळी, दादर परिसरातील सिमेंट रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. पावसाळ्यापूर्वी ही सर्व कामे वेळेत पूर्ण व्हावीत, असे निर्देशही …

Read More »

अजित पवार यांची घोषणा, बारामती राज्यात पहिल्या क्रमांकावर आणणार

मराठवाडा, विदर्भातील महारोजगार मेळाव्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील मेळाव्याचे आयोजन अहमदनगर नंतर बारामती येथे करण्यात आले. या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपस्थित होते. तर स्थानिक खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार हे आवर्जून उपस्थित होते. यावेळी अजित पवार बोलताना म्हणाले की, मागील अनेक …

Read More »

मुंबई उपनगरात महासंस्कृती महोत्सवांतर्गत बौद्ध महोत्सव आणि शबरी महोत्सवाचे आयोजन

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत काळात ‘महासंस्कृती महोत्सव २०२४’ अंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम राज्यभर आयोजित करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून, ‘मुंबई उपनगर जिल्ह्यात बौद्ध महोत्सव आणि शबरी महोत्सवाचे’आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज मंत्रालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना …

Read More »

जगातील रोजगाराची मागणी लक्षात घेवून कुशल मनुष्यबळ विकासित करणार

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आयुक्तालय व राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एन. एस. डी. सी.) यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्र इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय सुविधा केंद्राला मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळेल.राज्यात सहा ठिकाणी हे सुविधा केंद्र आहेत. परदेशात रोजगार प्राप्त व्हावा यासाठी जगातील रोजगाराची मागणी आणि त्याप्रमाणे कौशल्य विकास …

Read More »

मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, उपराष्ट्रपतींचा अपमान सहन करणार नाही…

तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी संसद भवन परिसरात उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती जगदीप धनकड यांचा अवमान करणारे असभ्य वर्तन केले आणि खासदार राहुल गांधी यांनी त्याचे चित्रण केले. सदर घटनेचा प्रखर विरोध करण्यासाठी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली भारतमाता सिनेमा ते लालबाग पोलीस स्टेशन परिसरात मोर्चा काढण्यात …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आवाहन, प्रत्येक जिल्ह्यात ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ राबवा

समाजातील प्रत्येक घटकाचा विकास होण्यासाठी आणि लोकोपयोगी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ प्रत्येक पालकमंत्र्यांनी प्राधान्याने राबवावा. शासनाच्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून राज्याच्या विकासाला गती द्यावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ बैठक सभागृह येथे, मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘नमो ११ कलमी कार्यक्रमाचा मुख्यमंत्री …

Read More »

पालकमंत्री आणि आयुक्त, महापालिकेच्या जमिनीवर अनधिकृत बांधकाम करणाऱ्यावर कारवाई कधी? मुंबईतल्या शासकिय जमिनीवरील अनधिकृत बांधकामाला महापालिकेचे पाठबळ

राज्यात सत्तेवर कोणीही येवो पण मुंबईत अनिधिकृत बांधकाम वाल्यांचे पेव काही केल्या कमी होताना दिसत नाही. विशेष म्हणजे मुंबईच्या शासकिय जमिनीवर वाढलेले अनधिकृत झोपडपट्ट्या किंवा सध्याच्या काळात नव्याने सिमेंट काँक्रीटच्या इमारती या मुंबई महापालिकेच्या आर्शिवादाशिवाय उभारल्या नसल्याची एक कागदोपत्री घटना नुकतीच उघडकीस आली आहे. मराठी ई-बातम्या.कॉम यासंकेतस्थळाकडे यासंदर्भातील सर्व कागदपत्रे …

Read More »

मुंबई उपनगरात झोपड्पट्टीवासीयांसाठी बांधणार ४० हजार शौचालये पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून बृहन्मुंबई महानगरपालिका वस्ती स्वच्छता कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्याद्वारे वांद्रे (प.) नित्यानंद नगर येथील लॉट १२ अंतर्गत दुरुस्त केलेल्या सार्वजनिक शौचालयांचे आज पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी लोकार्पण केले. यावेळी आमदार आशिष शेलार व मुंबई महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांची स्वच्छतागृहाची …

Read More »

गणेशमूर्ती हा लाखो हिंदूंच्या अस्थेचा विषय, मूर्तीवर शिक्का मारणे मान्य नाही पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती

गणेश उत्सव आता अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेला असताना या काळात पर्यावरण पूरक आणि इतर मूर्तींमधील फरक समजावा याकरीत महापालिकेतर्फे गणेशमूर्तींवर विविध प्रकारचे शिक्के मारण्याचे आदेश देण्यात आले होते. गणेश उत्सव हा लाखो हिंदूंचा आस्थेचा विषय असल्याने या निर्णयाऐवजी दुसरा पर्याय शोधावा असे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा …

Read More »

येरवडा आणि हवेली येथील औद्योगिक संस्थांना उपयुक्त व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करावेत- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुण्यातील येरवडा येथे मान्यता देण्यात आलेल्या नवीन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि हवेली येथील शासकीय औद्योगिक संस्थांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. पुणे येथील औद्योगिक संस्थांना उपयुक्त ठरणारे व्यावसायिक अभ्यासक्रम औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये सुरू करावेत, अशी सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यानी दिली. मंत्रालय …

Read More »