Breaking News

भाजपाच्या युवा नेत्याने केली आदिवासी मुलावर लघवीः हाच का हिंदूत्ववादाचा खरा चेहरा मध्य प्रदेश मधील घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल

भारत देशाला हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी भाजपाच्या नेत्यांकडून आणि त्यांच्या समर्थक अंध भक्तांकडून एकही संधी सोडली जात नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून वारंवार त्याचा उल्लेख करत एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य केले जाते. मात्र दलित-आदिवासी समाजाबद्दल भाजपाच्या हिंदू नेत्यांना किती कळवळा आहे या एक धक्कादायक व्हिडिओ पुढे आहे. भाजपाचा युवा नेता चक्क एका आदिवासी मुलावर लवघी करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने हिंदूत्ववादी भाजपाचा खरा चेहरा समोर आला आहे.

देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु या आहेत. मात्र त्यांना नव्या संसद भवन इमारतीच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जाणीवपूर्वक बोलावले नाही. तत्पूर्वी राजपथाचे नाव कर्तव्य पथ ठेवण्याच्या कार्यक्रमालाही राष्ट्रपती मुर्मु यांना बोलावले नाही. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील भाजपाचा युवा नेता प्रवेश शुक्ला याने रात्रीच्या वेळी दारू पिऊन एका आदिवासी मुलावर लवघी केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

विशेष म्हणजे हा व्हिडिओ अनेक आजी-माजी सनदी अधिकाऱ्यांनी आपल्या ट्विटर अकांऊटवर शेअर करत दलित-आदीवासी प्रती भाजपाचा हाच का खरा चेहरा असा सवाल विचारत माणूसकी संपली की काय असा सवाल केला आहे.

विशेष म्हणजे मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या मंत्रिमंडळातील एका नेत्याचा प्रवेश शुक्ला हा जवळचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान अनेकांनी प्रवेश शुक्ला यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांनाही ‘भाऊबीज भेट’

अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी तीन कोटी …

One comment

  1. Yacha aaychya had it pay
    Madharchod tula kay vatl
    Badya
    Chut chatya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *