Breaking News

भिडे-एकबोटे : महिला कार्यकर्त्यांना सोशल मिडीयावर शिव्यांची लाखोली सावळे आणि अंधारे यांना पोलिस संरक्षण देण्याची भीम आर्मीची मागणी

मुंबई : प्रतिनिधी

भिमा कोरेगाव येथील दलित हिंसाचाराच्या प्रकरणी मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. तसेच त्याचा पाठ पुरावा करत असल्याने याप्रकरणातील तक्रारकर्त्या आणि दलित कार्यकर्त्या अनिता सावळे आणि सामाजिक विषयांना वाचा फोडणाऱ्या प्रा. सुषमा अंधारे यांच्या विरोधात सोशल मिडीयावर सध्या ट्रोलिंग सुरु असून त्यांना शि‌व्यांची लाखोली वाहण्याचे काम भिडे आणि एकबोटे समर्थकांकडून सुरु आहे.

विशेषत: नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडेला क्लीन चीट देत अनिता सावळे यांनी संभाजी भिडेला ओळखत नसल्याचे पोलिसांना सांगितल्याची बाब विधानसभेत सांगितले. तेव्हापासून तर या दोन्ही दलित महिला कार्यकर्त्यांच्या फेसबुक वॉलवर मोठ्या प्रमाणात येवून अश्लील भाषेत शिव्या देत जीवे मारण्याची धमकी देण्याचे काम सर्रास सुरु झाले आहे. त्यामुळे अनिता सावळे आणि प्रा. सुषमा अंधारे यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.

याप्रकरणाची भीम आर्मी या सामाजिक संघटनेने दखल घेतली असून या दोन्ही दलित महिला कार्यकर्त्यांना पोलिसी संरक्षण पुरविण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका लेखी निवेदनातंर्गत करण्यात आल्याचे भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांनी सांगितले.

पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचा नेहमीच सन्मान राखला जातो. मात्र या दोन महिलांनी केवळ संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात दाद मागितल्याने त्यांना शिव्यांची लाखोली काही ठराविक समाजकंटकांकडून वाहणे कितपत योग्य आहे असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान याप्रकरणी भीम आर्मीच्या महिला आघाडी मुंबईच्या प्रमुख वर्षाताई कांबळे यांनी विनोबा भावे पोलीस ठाणे कुर्ला, सायबर गुन्हे (bkc) पोलीस ठाणे वांद्रे व मुंबई पोलीस आयुक्तांनाकडे तक्रार दाखल करत संबधित व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली.

 

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *