Breaking News

विधानसभा अध्यक्ष बागडे यांनी केली सांसदीय संकेताची ऐसी तैसी भाजपच्या जाहीर कार्यक्रमास आवर्जून हजेरी

मुंबई : प्रतिनिधी

राज्यघटनेने निर्माण केलेल्या कायदेमंडळाच्या अर्थात लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषदेच्या अध्यक्ष, सभापतींनी एकदा यापैकी कोणत्याही पदाचा पदभार स्विकारला की, त्यांनी निकोप कायदे मंडळ चालविण्यासाठी पुन्हा स्वपक्षाच्या कोणत्याही जाहीर कार्यक्रमाला हजर रहायचे नसते असे सांसदीय संकेत आहेत. मात्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी भाजपच्या बीकेसीतील स्थापना दिवसाच्या जाहीर कार्यक्रमाला हजेरी लावत सांसदीय संकेत आणि परंपरांना हरताळ फासल्याची चर्चा विधीमंडळ सदस्यांमध्ये सुरु झाली आहे.

विधानसभा किंवा विधान परिषद सभागृहाच्या अध्यक्ष किंवा सभापती पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर या दोन्ही पदावरील व्यक्तींनी पक्षिय राजकारणातून त्या पदाच्या जबाबदारीतून मुक्त होईपर्यंत लांब राहण्याची परंपरा महाराष्ट्रात आणि देशात परंपरा आहे. कारण सभागृहाच्या या वरिष्ठ पदावर बसल्यानंतर स्वतंत्र विचाराने सभागृहाचे कामकाज चालविणे घटनात्मक जबाबदारी सदर व्यक्तीवर येवून पडते. त्यामुळे आतापर्यंत महाराष्ट्रात तरी विधानसभेचे अध्यक्षांनी कधीही पक्षाच्या जाहीर कार्यक्रमाच्या सहभाग घेतला नाही. तसेच कार्यक्रमाला गेले तरी ते पक्षाच्या व्यासपीठावर विराजमान होत नसत.

मात्र विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी अध्यक्षाच्या पदावर विराजमान असतानाही भाजपच्या जाहीर कार्यक्रमात सहभागी होत व्यासपीठावर विराजमान झाले. त्यामुळे अध्यक्ष पदावर बसूनही त्यांची भाजपमधील पक्षीय राजकारणातील रस अधिकच असल्याचे दिसून येत आहे.

Check Also

इराणने ताब्यात घेतलेल्या जहाजावरील पहिला भारतीय क्रु मेंबर भारतात परतली

इराणी अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्याच्या शेवटी ताब्यात घेतलेल्या पोर्तुगाल ध्वजांकित MSC मेष या जहाजावरील सतरा भारतीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *