Breaking News

हम ने कर दिखाया असे जाहिरातून सांगणाऱ्या अदानी कंपनीची गुजरातवासियांकडून पोलखोल अहमदाबाद विमानतळ आणि परिसरात पाणीच पाणी

केंद्रात नरेंद्र मोदी प्रणित भाजपाचे सरकार आल्यापासून गौतम अदानी यांचा उद्योग सर्वात पुढे कसा काय या प्रश्नाचे उत्तर अमेरिकास्थित हिंडेनबर्ग रिसर्चकडून या संस्थेकडून जारी करत अनेक गोष्टींवर संशय व्यक्त केला. त्याविषयीचे वादळ शांत होते न होते तोच अदानी विमानतळ कंपनीने इतरांनी बांधलेल्या विमानतळाची जबाबदारी घेतल्यानंतर सर्व दूरचित्रवाहिन्यांवर हम ने कर दिखाया अशा प्रचारकी थाटाच्या जाहिराती सुरु केल्या. मात्र मागील दोन दिवसांपासून गुजरातमध्ये पडत असलेल्या पावसामुळे अहमदाबाद विमानतळ आणि परिसराला एखाद्या तलावाचे स्वरूप आल्याचा एक व्हिडिओ प्रवासकर्त्याने आपल्या ट्विटरवरून व्हायरल केला आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर क्या यही कर दिखाया क्या असा सवालही नेटकऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे अदानी कंपनीने केलेल्या दाव्यातील फोलपणा बाहेर आला आहे.

याशिवाय अहमदाबाद शहराची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटी म्हणून घोषणा केलेली आहे. मात्र तरीही येथील सांडपाण्याचा आणि पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पुरेशी तजवीज केली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहर आराखड्यातील व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे दिसत आहे. याशिवाय मागील दोन दिवसांपासून जुनागड येथे पावसामुळे पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच अनेक चारचाकी वाहणे पुराच्या पाण्यात वाहून जाताना दिसत आहेत.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *