Breaking News

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलांवामध्ये किती आहे पाणी साठा पाणी कपातीचा निर्णय रद्द होणार की तसाच पुढे सुरु राहणार

मान्सूनच्या आगमनाला उशीर झाल्याने मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये वापरा योग्य कमी पाण्याचा साठा राहिला. यापार्श्वभूमीवर पाणी कपातीचा निर्णय मुंबई महानगरापालिकेने घेतला होता. मात्र मागील काही दिवसांपासून मुंबईसह काही भागात सातत्याने मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये आणि धरणक्षेत्रात थोडा थोडा करीत आता ५०.१८ टक्के पाणी साठा जमा झाला आहे. त्यामुळे पाण्याची चिंता काहीशी मिटली असली तरी हा पाणीसाठा गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत कमी आहे. गेल्यावर्षी याच दिवशी ८७ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा होता.

गेल्या आठ दिवसात मुंबई महानगरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे धरणसाठ्यातही वाढ झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणात मिळून ७ लाख २६ हजाराहून अधिक पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा एकूण साठवण क्षमतेच्या ५० टक्के आहे. मात्र अजूनही गेल्यावर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमीच आहे.

उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सात धरणातून मुंबईला दर दिवशी ३८०० दशलक्षलीटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. हे तलाव पूर्ण भरलेले असतात तेव्हा सातही तलावातील पाणीसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटर इतका असतो. सातही धरणातील पाणीसाठा १४ लाख ४७ हजार दशलक्षलीटरवर पोहोचल्यानंतर मुंबईकरांना पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करणे शक्य होते. १ ऑक्टोबरला सर्व तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले असले तर वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत राहतो. त्यामुळे पुढचे दोन महिने धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडणे आवश्यक आहे.

सात धरणांपैकी मुंबईतील तुळशी तलाव भरून वाहू लागला आहे. तर तानसा आणि विहार ही धरणे देखील ८० टक्क्यांहून जास्त भरली आहेत.

Check Also

भारतीय राज्यघटना बदलली तर राष्ट्र कोलमडेल

देशातील अठरापगड जातधर्माचे १४० कोटी लोक राज्यघटनेमुळे एकत्र नांदत असून देश एकसंघ आहे. भारतीय राज्यघटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *