Breaking News

आणि मृद व जलसंधारण मंत्री गडाखांनी परत केले पोलीस आणि वाहन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेसाठी निर्णय

अहमदनगर : प्रतिनिधी

कोणत्याही एखाद्याला विशेषत: लोकप्रतिनिधीला समाजात आपली वट वाढविण्यासाठी कारण नसताना पोलिसांचा बंदोबस्त मागून घेत त्यात फिरायला आवढते. मात्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी मंत्री म्हणून आपल्या सुरक्षेसाठी असलेले पोलीस कर्मचारी व ते वापरत असलेले पोलीस वाहन कोरोना व्हायरस प्रार्दुभाव रोखण्यासाठी अहमदनगर पोलीस अधीक्षक यांना पत्र पाठवून वापरण्यासाठी परत पाठवून देत त्याची परवानगी ही दिली.

मंत्री गडाख यांनी पत्रात लिहले आहे,देश आणि महाराष्ट्र कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रात राष्ट्रहितासाठी संचारबंदी लागु केली आहे. याचे काटेकोरपणे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून आपल्या भागातील संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी संपुर्ण पोलीस यंत्रणा आटोकाट प्रयत्न करत आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेवर आलेला अधिकचा ताण पाहता मंत्री म्हणून माझ्या (Spotting) सुरक्षेसाठी असलेले पोलीस कर्मचारी व ते वापरत असलेले पोलिस वाहन आपण शहर व परिसरातील संचारबंदीच्या अमलबजावणीसाठी वापरण्यास माझी काहीही हरकत नाही.

आज रोजी माझ्या सुरक्षेपेक्षा देशाची तसेच महाराष्ट्राची व येथील जनतेची सुरक्षा महत्वाची आहे. महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझे ते कर्तव्य आहे. करिता मी आजपासून माझे सुरक्षेसाठी असलेले पोलिस कर्मचारी व ते वापरत असलेले पोलिस वाहन कोरोना व्हायरस प्रार्दुभाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनेत वापरण्यास आपणास याद्वारे परवानगी देत असल्याचेही त्यांनी पोलीस अधीक्षक यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.

गडाख यांनी याद्वारे एक वेगळा आदर्श इतर लोकप्रतिनिधींसमोर निर्माण केला असून या पध्दतीचा निर्णय इतर मंत्री, लोकप्रतिनिधींनीही करावा अशी मागणी सामाजिकस्तरातून करण्यात येत आहे.

Check Also

तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांसाठी गोड बातमी: मानधनात वाढ उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली घोषणा

मुंबई: प्रतिनिधी मागील अनेक वर्षापासून तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करावी अशी मागणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *