Breaking News

Tag Archives: corona virus

राज्यात ओमायक्रॉन आणि कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्याप्रमाणावर वाढ ओमायक्रॉनचे ३१ तर कोरोनाचे १६४८ रूग्ण आढळून आले

मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात असल्याचे दिसून येत होते. तर ओमायक्रॉनचे रूग्ण एकदं-दुसरा आढळून येत होता. परंतु नववर्ष स्वागतानिमित्त खरेदीच्या आणि अन्य कारणासाठी घराबाहेर पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने नागरीकांकडून काहीप्रमाणात निष्काळजीपणा होत आहे. यापार्श्वभूमीवर आज कोरोनाचे १६४८ रूग्ण आढळले असून यापैकी सर्वाधिक रूग्ण ८९६ …

Read More »

राज्यात कोरोना चाचणीचे दर आणखी झाले कमी प्रति तपासणी ३०० रुपयांची कपात-आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारीत करण्यात आले असून प्रति तपासणी ३०० रुपये कमी करण्यात आले आहे. त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी १९००, २२०० आणि २५०० रुपये असे कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार …

Read More »

नांदेड, औरंगाबाद, जालना, लातूर, अमरावतीत चाचणीच्या सुविधा द्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची केंद्राकडे मागणी

मुंबई: प्रतिनिधी राज्यात नांदेड, औरंगाबाद, जालना, लातूर, अमरावती याठिकाणी कोरोना चाचण्यांसाठी परवानगी द्यावी, पीपीई उत्पादक कंपन्यांचे प्रमाणीकरण जलदगतीने करावे, रॅपीड टेस्ट कधी कराव्यात याबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शन करतानाच त्यासाठी आवश्यक किटस्ही उपलब्ध करून देण्याची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्री यांच्याकडे केली. कोरोनाबाबत राज्यांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय …

Read More »

कोरोना लढ्यांसाठी सर्व आयएएस अधिकाऱ्यांच्या पत्नींनी दिले १ लाख ७५ लाख रूपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिली रक्कम

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणुच्या संकट निवारणासाठी राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या पत्नींची असलेल्या ‘दी आयएएस ऑफिसर्स वाईव्ज असोसिएशन’ या संघटनेमार्फत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १ लाख ७५ हजार रुपयांची मदत देण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती अंजना प्रसाद आणि सचिव डॉ. राखी गुप्ता यांनी यासाठीचा धनादेश राज्याचे गृह आणि गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार यांच्याकडे …

Read More »

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयानों या गोष्टी करा अधिकारी कर्मचाऱ्यांना पीपीई किट व मास्क देण्याची सूचना

 मुंबई : प्रतिनिधी खाजगी रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवश्यक असलेले पीपीई किट, एन 95 मास्क, ग्लोव्हज व इतर साहित्य उपलब्ध करण्याची सूचना मुंबई महापालिकेने केली असून त्यासंदर्भातील मार्गदर्शन सूचना जारी करण्यात आले. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय रुग्णालयाबरोबरच खासगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कक्षसेवक हे काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांना संसर्ग होऊ नये यासाठी खासगी रुग्णालय प्रशासनाने काळजी …

Read More »

उध्दव ठाकरेंना राज्यपाल नियुक्त सदस्य करण्याचा अजित पवारांचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत प्रस्ताव पाठविण्यावर शिक्कामोर्तब

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विधान परिषद किंवा विधानसभेवर निवडूण येणे आवश्यक आहे. मात्र कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्वच निवडणूका निवडणूक आयोगाने पुढे ढकलल्याने अखेर मुख्यमंत्र्यांना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राजकिय संकेतानुसार स्वत: मुख्यमंत्री …

Read More »

LOCKDOWN- एक संधी मानसशास्त्रज्ञ संध्या काळे यांचा खास लेख

कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी आपल्या आजूबाजूला सर्वच स्तरातून प्रयत्न सुरू आहेत. हा संसर्ग लवकर कमी व्हावा असे वाटत असेल तर सर्वांनीच कसोशीने प्रयत्न करायला हवेत. “सोशल डिस्टनसिंग “, पर्सनल हायजिन , फार महत्त्वाचे आहे . एक मानसशास्त्रज्ञ म्हणून सांगायचे झाले तर या “लॉकडाऊन” कडे  संकट कमी आणि संधी जास्त असे पहायला …

Read More »

खोट्या बातम्या आणि अफवा प्रकरणी २४ तासात २० जणांवर सायबर गुन्हे राज्याचे सायबर अधिक्षक बालासिंग राजपूत यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात आपतकालीन कायदा लागू केलेल्या असतानाही काहीजणांकडून कोरोना आजाराच्या अनुषंगाने खोट्या बातम्या, अफवा आणि एखाद्या समाजाविषयी तिरस्कार युक्त प्रक्षोभक साहित्य प्रसारीत केल्याप्रकरणी मागील २४ तासात २० जणांच्या विरोधात सायबर कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती सायबर विभागाचे अधिक्षक बालासिंग राजपूत यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये दिली. दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांपैकी …

Read More »

मोठ्या शहरांमध्ये मोबाईल तर तालुकास्तरावर रक्षक क्लिनिक महाराष्ट्र कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात नसल्याचा आरोग्यमंत्री टोपेंचा निर्वाळा

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक खाजगी रूग्णालयांनी आणि डॉक्टरांनी स्वत:ची क्लिनिक बंद केल्याने राज्यातील जनतेला भेडसावणाऱ्या इतर आरोग्याच्या तक्रारीवर इजाल होईनासा झाला. त्यामुळे ‘इंडियन मेडिकल असोशिएशन’च्यावतीने (आयएमए) तालुकास्तरावर ‘रक्षक’ क्लिनिक सुरू आणि मोठ्या शहरांमध्ये मोबाईल क्लिनिक देखील सुरू करणाचे आश्वासन ‘आयएमए’च्या पदाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी …

Read More »

१२ वीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनों या वेबसाईटवर वाचा तुमच्या अभ्यासक्रमाची पुस्तके कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाचा निर्णय

मुंबई ; प्रतिनिधी ११ वीची परिक्षा दिली, निकाल येणे बाकी आहे. पुढचे वर्षे १२ वीचे आहे. आणि त्यात कोरोनाने घोळ घातलाय. किती दिवस घरात बंद रहावे लागेल याबाबत कोणतीच निश्चितता नाही. मात्र घाबरू नका विद्यार्थी मित्रांनो तुमच्या परिक्षेचा निकाल लागेल तेव्हा लागू द्या. मात्र तुम्हाला १२ वीचा अभ्यास सुरु करता …

Read More »