Breaking News

भारत देश म्हणजे धर्मशाळा आहे का? मनसेप्रमुख राड ठाकरे यांची नागरीकत्व कायद्यावर टीका

पुणेः प्रतिनिधी
१३५ कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाला आणखी लोकांची काय आवश्यकता अशी खोचक विचारणा करत सर्व देशाच्या लोकांना सामावून घ्यायला भारत देश काय धर्मशाळा आहे असा सवाल नागरीकत्व कायद्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
देश म्हणून आपण आणखी ओझं वाहू शकत नाही. वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक यंत्रणा निकामी ठरल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही धर्माचा माणूस असेल त्याला बाहेरून आपल्या देशात आणायची काय गरज आहे? असा सवालही त्यांनी केला.
सर्व लोकांना सामावून घेण्यासाठी भारत ही काही धर्मशाळा नाही. अन्य देशातून आलेल्या लोकांना हाकलवून दिलं पाहिजे. माणुसकीचा ठेका हा काही भारतानंच घेतलेला नाही. इकडे राहत असलेल्यांची चिंता मिटत नाही, तर बाहेरून आणखी लोकं का हवी असा उपरोधिक सवालही त्यांनी केला.
संपूर्ण देशात जी काही आर्थिक मंदी आहे त्यावरून लक्ष विचलीत करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या निमित्तानं केल्याचा आरोप करत बांग्लादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तानातून येणाऱ्या मुस्लिमांना देशाबाहेर हाकलंल पाहिजे. नेपाळ, पाकिस्तानातून किती मुस्लिम आले त्याची तपासणी होणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले. .
सध्या देशात आर्थिक मंदीचं वातावरण आहे. अजून आपल्याला मंदीचा सामना करायचा आहे. देशाच्या ढासळत्या आर्थिक स्थितीवरुन नागरीकांचे लक्ष विचलित करण्यासाठी सुधारित नागरिकत्व कायदा, एनआरसी सारखे मुद्दे समोर आणल्याची टीकाही त्यांनी केली.
त्याचबरोबर आधारकार्ड मतदानासाठी चालू शकते मग नागरीकत्व सिद्ध करण्यासाठी आधारकार्ड का चालू शकत नाही? असा सवाल करत आधारकार्डासाठी लोकांना तासनतास रांगेत उभं केलं त्याचा उपयोग काय? उपहासात्मक प्रश्नही उपस्थित केला.

Check Also

विनोद तावडे यांचा टीका, संविधान ८० वेळा बदलणाऱ्या काँग्रेसचा…

गोव्यातल्या काँग्रेस उमेदवाराने गोव्यात भारतीय संविधान लागू करू नये, अशी मागणी केली आहे, तर कर्नाटकातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *