Breaking News

Tag Archives: caa

राष्ट्रवादी- शिवसेना म्हणाली, दूषित वातावरण होतेय भाजपाने बोलू नये एनपीआर, सीएएच्या कायद्यावरून विधानसभेत रणकंदन

मुंबईः विशेष प्रतिनिधी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या एनपीआर आणि सीएए कायद्यामुळे राज्यातील कोणाचेही नागरिकत्व जाणार नाही. मात्र याबाबतच्या अफवा राज्याच्या मंत्र्यांकडूनच पसरविल्या जात असल्याने याप्रश्नी गृह विभागाने लक्ष घालण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यात माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दोन मंत्र्यांच्या नावाचा उल्लेख करून त्यांना बोलू न …

Read More »

सीएए आमच्या अखत्यारीत नसताना आम्ही का राबवावा ? राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांचा सवाल

मुंबईः प्रतिनिधी सीएए अंमलबजावणी राज्य सरकारच्या अखत्यारीत नाही. सर्व अधिकार केंद्राकडे आहे. आमच्या अखत्यारित नसताना का राबवावा असा सवाल करतानाच एनआरसी लागू होवू देणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी जाहीर केले. एनआरसी आणणार नाही असे सांगून आपली भूमिका भाजपने बदलली. मात्र याबाबत सरकारने …

Read More »

देशाबाहेर काढणारा कायदा नसल्याचे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता जाहीर समर्थन करावे भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांचे आवाहन

मुंबईः प्रतिनिधी नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सीएएबदद्ल गैरसमज आहेत. हा कोणालाही देशाबाहेर काढण्याचा कायदा नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच म्हणाले. त्यामुळे त्यांनी आता सीएएच्या समर्थनाची उघड आणि स्पष्ट भूमिका जाहीर करावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी केले. मुख्यमंत्री ठाकरे यांची बुधवारच्या मुलाखतीतील …

Read More »

CAA विरोधी आंदोलकांच्या रेट्यापुढे पोलिसांची माघार राज्यघटनेच्या उद्देशिका वाचनास दिली २० मिनिटांची परवानगी

कल्याणः प्रतिनिधी संपुर्ण देशभरात CAA अर्थात केंद्राच्या नागरीकत्व कायद्याच्या विरोधात आंदोलने सुरु आहेत. या आंदोलनाचा भाग म्हणून आम्ही भारताचे लोक समितीतर्फे येथील डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर शांततामय मार्गाने आंदोलन करण्यात येणार होती. सुरुवातीला पोलिसांनी या आंदोलनास परवानगी नाकारली. मात्र आंदोलनकर्त्ये नियोजित जमा होवू लागल्याने अखेर पोलिसांनीच माघार घेत आंदोलनकर्त्यांना अवघ्या २० मिनिटांची …

Read More »

बिदरच्या धर्तीवर मुंबईतील शाळा चालकांवरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी बिदरमधील विद्यार्थ्यांनी सुधारित नागरिकता कायद्याविरोधात (सीएए) नाटक सादर केल्यावरुन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जात असेल तर त्याच धर्तीवर मुंबईतील शाळकरी मुलांना सीएएच्या समर्थनासाठी वेठीस धरणारे शाळा व्यवस्थापन, आयोजक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. भाजपशासित राज्यात सीएएविरोधात …

Read More »

नागरिकत्व कायद्याच्या विरोधात मुख्यमंत्र्यांना पत्रे, सर्वोच्च न्यायालयात याचिका आम्ही भारतीय लोक मंचच्यावतीने ५ हजार याचिका दाखल

मुंबईः विशेष प्रतिनिधी केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या नागरीकत्व कायदा, नागरीक नोंदणी आदी कायद्यांच्या विरोधात कल्याण मधील आम्ही भारतीय लोक मंचच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना १० हजार पत्रे तर सर्वोच्च न्यायालयात ५ हजार याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती मंचचे समन्वयक अॅड. फाऊख निझामी यांनी दिली. केंद्राने लागू केलेला कायदा महाराष्ट्रात …

Read More »

छत्रपतींचा अवमान करणाऱ्या भाजपाविरोधात काँग्रेस तीव्र आंदोलन करणार उद्या राज्यभर तीव्र आंदोलन करण्याची प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. छत्रपतींच्या नावाने मते मागून सत्तेवर आलेल्या भाजपाकडून शिवाजी महाराजांची तुलना नरेंद्र मोदींशी करण्याचा खोडसाळपणा सुरू आहे. या अगोदरही अजयकुमार बिष्ट आणि विजय गोयल यांनी नरेंद्र मोदींची तुलना शिवरायांशी करण्याचा प्रयत्न केला होता, आताही ‘आजके शिवाजी :नरेंद्र मोदी’ या …

Read More »

पंतप्रधान मोदींनाच आम्ही भीती दाखविणार वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा इशारा

मुंबईः प्रतिनिधी देशात सीएए (CAA) आणि एनआरसी (NRC) विधेयकांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १५ लाख रूपये देण्यावरून जसे खोटे बोलले तसे ते आता याप्रश्नीही खोटे बोलत आहेत. या विधेयकावरून पंतप्रधान मोदी हे जनतेला भीती दाखवित आहेत. मात्र आता आम्ही त्यांना भीती दाखविणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर …

Read More »

भाजपा म्हणते, काँग्रेसने किमान स्वत:ची कागदपत्र तरी नीट वाचावित ती स्थानबद्धता केंद्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार-केशव उपाध्ये

मुंबईः प्रतिनिधी स्थानबध्द केंद्र निर्माण करण्यासाठी काँग्रेसने जारी केलेली कागदपत्रे आधी त्यांनीच आधी नीट वाचायला हवीत असा खोचक सल्ला भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देत काँग्रेसचे प्रवक्ते हे आपल्या सोयीची कागदपत्र वापरून बेताल वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध असल्याची टीका त्यांनी केली. काँग्रेसच्या अशा बेताल वक्तव्यांना भारतीय जनता पार्टीने वारंवार उघडे पाडले …

Read More »

पंतप्रधान म्हणतात चर्चा झाली नाही, मग स्थानबध्द केंद्राचे पत्र कसे जारी केले एनआरसी कायद्यावरून खोटं बोलत असल्याचा काँग्रेसचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनआरसी कायद्याबाबत मंत्रिमंडळात आणि संसदेत चर्चा झाली नसल्याचे सांगितले. मात्र देशाचे गृहमंत्री सीएए आणि एनआरसी कायदा संपूर्ण भारतात राबविणार असल्याचे संसदेसह इतर ठिकाणी जाहीररित्या सांगत आहेत. तसेच स्थानबध्द केंद्र स्थापन करण्याबाबत सर्व सरकारांना केंद्राकडून पत्र पाठविण्यात आल्याने मग चर्चा न करताच ही …

Read More »