Breaking News

राफेल प्रकरणी बुडत्या मोदी सरकारचा पाय अधिक खोलात काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयात राफेल संबंधित पुनर्विचार याचिकेवर सुरु असलेल्या सुनावणी दरम्यान अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी याचिकाकर्ते प्रशांत भूषण यांच्यावर संरक्षण खात्यातील गुप्त कागदपत्रे चोरल्याचा आरोप करून त्या कागदपत्रांचा विचार करू नये अशी विनंती न्यायालयाला केली. प्रत्यक्षात ही कागदपत्रे माहिती अधिकारातून उपलब्ध झाली आहेत असे प्रशांत भूषण यांनी सांगितले. भर कोर्टात बसलेल्या या चपराकीनंतरही वेणुगोपाल यांनी गप्प न बसता द हिंदू या वर्तमानपत्राने हीच कागदपत्रे प्रसिद्ध केली असल्याने त्यावर गोपनीयता कायद्याच्या आधारे कारवाई करावी अशी अजब मागणी केली. सरकारी वकील वेणुगोपाल यांची ही फजिती राफेल प्रकरणी बुडत्या मोदी सरकारचा पाय अधिक खोलवर जात आहे हे दर्शवणारी आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी केली आहे.
वेणुगोपाल यांना याचे ही भान नाही की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मिळालेल्या माहितीचा स्त्रोत उघड करण्याचे बंधन पत्रकारांवर नाही. राफेल प्रकरणात सगळेच लपविण्यासारखे आहे आणि ते उघड करणा-यांबद्दल मोदींच्या मनात सूड भावना असल्याचे सिध्द होत असल्याचे ते म्हणाले.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *