Breaking News

या दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री नेमके कोण? दोन्ही गटांकडून दावा रायगड- नाशिक जिल्हा पालकमंत्री पदाचा तिढा कायम

शिंदे गटाचे महाडचे आमदार भरत गोगावले रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आस लावून बसले असताना बुधवारी राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या सुधारीत यादीत रायगड आणि नाशिक जिल्ह्याचा तिढा सुटलेला नाही. तो अद्यापही कायम आहे.

शिंदे फडणवीस सरकारमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदासाठी दोन नावे स्पर्धेत आहेत. राष्ट्रवादी कॉग्रेस आणि शिंदे गटात या पदासाठी रस्सीखेच सुरू असल्याने नव्याने जाहीर झालेल्या पालकमंत्र्यांमध्ये रायगडचा अधिकृत पालकमंत्री जाहीर करण्यात आलेला नाही. १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची यादी जाहीर केली असली, तर ज्या रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात सर्वाधिक संघर्ष आहे त्यामुळे तो निर्णय घेण्यात आलेला नाही. रायगडच्या पालकमंत्री पदाचा अतिरिक्त भार सध्या शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांच्याकडेच आहे.

याबाबत भरत गोगावले म्हणाले की, सध्या रायगडचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांच्याकडे आहे. म्हणजे ते आमच्याकडेच आहे. त्यामुळे काही अडचण नाही. आमची वर्णी लागत नाही तोवर ते पद त्यांच्याकडेच राहील, असे स्पष्ट केले.
दरम्यान, रायगडच्या पालकमंत्री पदी तुमची वर्णी लागेल का? असे विचारण्यात आल्यावर पालकमंत्री पदासाठी आमची धावपळ तर सुरू आहे. योग्यवेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील. मी मंत्रीच झालो नाही तर पालकमंत्री कसा होणार? असा सवाल केला.

राज्यात माविआ सरकार असताना भरत गोगावले पालकमंत्री पदाची आस लावून बसले होते. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर मविाआचं सरकार बरखास्त झालं एकनाथ शिंदे आणि भाजपा सरकारने पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार केला. पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात भरत गोगावलेंना संधी मिळाली नाही. दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना संधी दिली जाईल, असं आश्वासन देण्यात आलं. पुढे जून महिन्यात अजित पवार राष्ट्रवादीत बंड करून सरकारमध्ये सहभागी झाले त्यांच्यासोबत आलेल्या आठ आमदारांसह दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार झाला. परंतु, या दुसऱ्या विस्तारातही भरत गोगावलेंची वर्णी लागली नाही. मात्र, मंत्रिमंडळात मला नक्की स्थान मिळेल, असा विश्वास भरत गोगावले यांनी व्यक्त केला.

दरम्यान, आज १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी अजित पवार गटाच्या मंत्री आदिती तटकरे आणि शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांच्या रस्सीखेच सुरू आहे. या जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळावं म्हणून भरत गोगावलेंनी प्रचंड आस लावून आहेत. परंतु, त्यांच्या गळ्यात मंत्री पदाची माळ पडत नसल्याने त्यांना पालकमंत्री होता येत नाही. येत्या घटस्थापना पर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात तरी भरत गोगावलेंना मंत्रिपद मिळेल का हे पाहावं लागणार आहे.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *