Breaking News

Tag Archives: नाशिक

छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ओबीसींचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा आग्रह धरला. मात्र एक महिन्याचा कालावधी उलटून देखील राज्यातील नेतृत्वाने उमेदवारी जाहीर न झाल्याने मंत्री छगन भुजबळ यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. मंत्री छगन भुजबळ यांनी या निर्णयाचा …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, … भाजपाचे राजकारण धर्माच्या आधारावर

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुराज्य स्थापन केले तर संत महंतांनी अध्यात्माचे कार्य केले. शिवाजी महाराजांनी राजकारणात धर्म आणला नाही. छत्रपतींच्या सुराज्यात शेतकऱ्याच्या भाजीच्या देटालाही हात लावू नका अशी शिकवण होती पण आज भाजपाच्या राज्यात शेतकरी दररोज मरत आहे आणि सत्ताधाऱ्यांना त्याचे काहीच देणेघेणे नाही. अनेक पक्षांची सरकारे आली व गेली पण …

Read More »

पंतप्रधान मोदींच्या काळाराम मंदिरातील पूजेने धर्मातील विषमतेवर शिक्कामोर्तब की…

२२ जानेवारी २०१४ रोजी लाखो-करोडा हिंदू धर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या रामाचे अयोध्येत नव्याने राम मंदिर उभारण्यात आलेल्या राम मंदिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. मात्र शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजपा आणि राम मंदिराच्या विश्वस्तांनी राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे आमंत्रण दिले नाही. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी २२ जानेवारी २०२४ …

Read More »

नाशिकला १२ जानेवारीपासून राष्ट्रीय युवा महोत्सव; पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन

राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड झाल्याने महाराष्ट्राला संधी मिळाली आहे. त्याच्या आयोजनात कुठलीही कमतरता भासू देऊ नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणारा हा महोत्सव यशस्वी करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. राज्यभरातील युवकांनी यात सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे राष्ट्रीय …

Read More »

या दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री नेमके कोण? दोन्ही गटांकडून दावा रायगड- नाशिक जिल्हा पालकमंत्री पदाचा तिढा कायम

शिंदे गटाचे महाडचे आमदार भरत गोगावले रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आस लावून बसले असताना बुधवारी राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या सुधारीत यादीत रायगड आणि नाशिक जिल्ह्याचा तिढा सुटलेला नाही. तो अद्यापही कायम आहे. शिंदे फडणवीस सरकारमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदासाठी दोन नावे स्पर्धेत आहेत. राष्ट्रवादी कॉग्रेस आणि शिंदे गटात या पदासाठी रस्सीखेच सुरू …

Read More »

कांद्याचा वांदा वाढलाः अजित पवार म्हणाले, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही बैठक पार पडली पण निर्णय झाला नाही

नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांच्या समस्यांवर केंद्र शासनाच्या सहकार्यातून मार्ग काढला जाईल, असा विश्वास देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कांदाप्रश्नी मंत्रालयात आयोजित बैठकीतूनच केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना दूरध्वनी केला. पियुष गोयल यांनीही उपमुख्यमंत्र्यांच्या दूरध्वनीला प्रतिसाद देत आजच संध्याकाळी (२६ सप्टेंबर) मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत, …

Read More »

ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी सर्व घटकांनी एकत्र राहण्याची आवश्यकता कुंभार समाज बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द - मंत्री छगन भुजबळ

कुंभार समाज ओबीसी समाजात मोडतो. ओबीसी घटकांमध्ये कुंभार समाज लोकसंख्येने मोठा समाज असून ओबीसींच्या प्रश्नावर लढा देण्यासाठी पुढं आल पाहिजे. ओबीसींना आपले हक्क अबाधित ठेवायचे असतील तर सर्व ओबीसी घटकांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. मंत्री छगन …

Read More »

पुणे-नाशिक रेल्वेमार्ग हा मेट्रो कायद्यानुसार करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या विकासासाठी महत्त्वाचा असणारा पुणे-नाशिक रेल्वेमार्ग पूर्ण करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. हा प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी त्यातील अडचणी दूर कराव्यात. या अनुषंगाने पुणे-नाशिक रेल्वेमार्ग हा मेट्रो कायद्यानुसार पूर्ण करण्याबाबतचा प्रस्ताव परिवहन विभागाने मंत्रिमंडळासमोर आणावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भातील बैठकीत दिले. उपमुख्यमंत्री अजित …

Read More »

नाना पटोले म्हणाले, आदिवासी संस्कृती संपवण्याचे पाप करणाऱ्या भाजपाला धडा शिकवा भाजपा सरकारच्या काळात आदिवासी समाजावरचे अत्याचार वाढले

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली, त्यातील ५५ वर्ष केंद्रात काँग्रेसची सत्ता राहिली. काँग्रेस पक्ष सत्तेवर असताना आदिवासी समाजावर अत्याचार होऊ दिले नाहीत पण भाजपा सरकारच्या काळात मात्र मणिपूर असो वा महाराष्ट्र सर्व भागात अत्याचार वाढले आहेत. आदिवासीच या देशाचा मुळनिवासी आहे, जल, जमीन जंगलवर त्यांच्याच अधिकार आहे परंतु आदिवासींची …

Read More »

सायबर व आर्थिक गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सदैव सज्ज रहा महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी येथे दीक्षांत संचलन संपन्न: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनी ही देशातील उज्ज्वल नावलौकिक असलेली प्रबोधिनी आहे. या प्रबोधिनीत प्रशिक्षण घेऊन देशसेवेत येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकांसमोर सायबर व आर्थिक स्वरूपाच्या गुन्हेगारीची आव्हाने असल्याने ही गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सदैव सज्ज रहावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आज महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरिक्षक सत्र …

Read More »