Breaking News

पंतप्रधान मोदींच्या काळाराम मंदिरातील पूजेने धर्मातील विषमतेवर शिक्कामोर्तब की…

२२ जानेवारी २०१४ रोजी लाखो-करोडा हिंदू धर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या रामाचे अयोध्येत नव्याने राम मंदिर उभारण्यात आलेल्या राम मंदिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. मात्र शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजपा आणि राम मंदिराच्या विश्वस्तांनी राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे आमंत्रण दिले नाही. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी २२ जानेवारी २०२४ रोजी नाशिक येथील प्रसिद्ध अशा काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार असल्याचे जाहिर केले. मात्र आज मुंबईसह नाशिकच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर राजकिय कुरघोडी करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या आधी काळाराम मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावली. परंतु २१ व्या शतकातही हिंदूधर्मातील विषमतेचे प्रतिक बनलेल्या काळाराम मंदिरातील स्त्री-पुरुष भेदभावा सारख्या चुकीच्या चालीरितींबाबत चकार शब्द न काढणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दर्शनासाठी काळाराम मंदिरात खास जाऊन दर्शन घेतले. नरेंद्र मोदी यांच्या भक्तिभावामुळे त्यांनी हिंदू धर्मातील वाईट प्रथांना पाठिंबा दिला की राज्यघटनेने गुन्हा ठरविलेल्या गोष्टींनाच नरेंद्र मोदी गोदावरी नदीत बुडवू पहात आहेत असा सवाल या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्ष संकल्पनेला हारताळ फासत प्रत्येक हिंदू देवदेवतांच्या प्राचीन मंदिराला जाणीवपूर्वक भेटी देत एका विशिष्ट समुदायाच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण करण्यात असल्याबाबतचा आरोप धर्मनिरपेक्षतावादी विचारसरणीच्या नेत्यांकडून सातत्याने करण्यात येत आहे. मात्र सध्या हिंदू धर्मियांचे रक्षक म्हणून आपणच असल्याची प्रतिमा स्थापित करण्याची संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाकडून एकही सोडली जात नाही. तसेच घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीकडून एखाद्या विशिष्ट समुदायाच्या मनात भीती निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करू नये असे स्पष्टपणे सांगितले आहे. तसेच अशी कोणतीही गोष्ट घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीवर केले असेल तर त्या व्यक्तीवर देशाच्या धर्मनिरपेक्षतेच्या मुळ संकल्पनेला धक्का लावत असल्याचे मानले जाते.

काळाराम मंदिराचे मुख्य महंत आचार्य महामंडलेश्वर सुधीरदास महाराज, श्री काळाराम मंदिर संस्थानचे विश्वस्त धनंजय पुजारी, मंगेश पुजारी, नरेश पुजारी, मंदार जानोरकर, एकनाथ कुलकर्णी, पं. प्रणव पुजारी, अद्वय पुजारी तसेच वारकरी आणि संत परिवारातील मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिराला विशेष भेट देत दर्शन घेतल्याने ज्या काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा म्हणून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर सत्याग्रह अनेक वर्षे केला. मात्र या काळाराम मंदिरात अखेरपर्यंत दलितांना प्रवेश नाकारला. तर काही महिन्यांपूर्वी राजश्री शाहू महाराज यांच्या कोल्हापूर गादीच्या नात सून यांनीही काळामंदिरात जाऊन विधीवत पूजा करण्यासाठी गेल्या. मात्र त्या स्त्री असल्याचे कारण पुढे करत त्यांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारत त्यांच्या हस्ते पुजा करण्यासही तेथील महतांनी नकार दिल्याचे वृत्त मध्यंतरी भलतेच चर्चेत आले. परंतु त्याच मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मात्र धार्मिक विधीवत पुजा करण्यास परवानगी दिली.

या सगळ्या पार्श्वभूमीवर सामाजिक विषमतेला खतपाणी घालण्याचे प्रतिक बनलेल्या काळाराम मंदिरात जाऊन पूजा दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याने २१ व्या शतकात राज्यघटनेने स्त्री-पुरूष भेद करण्यास गुन्हा ठरविलेले असतानाच पंतप्रधानच अशा मंदिरात जात असतील तर देशाचे घटनात्मक प्रमुख हे नेमके त्याचे धार्मिक प्राचीनस्थळ म्हणून दर्शन घेत आहेत की त्या मंदिराच्या महंताकडून धर्म रक्षणाच्या नावाखाली विषमता पाळणाऱ्या वाईट प्रथांना पाठिशी घालत आहेत याबाबत एकदा भूमिका जाहिर करावी अशी मागणी तमाम आंबेंडकरवादी आणि धर्मनिरपेक्षतावादी विचारवंताकडून उपस्थित करण्यात येत आहे.

Check Also

नव्या न्यायसंहिता आणि टेलिकम्युनिकेशन कायद्याला राष्ट्रपतींची मंजूरी

संसदेच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान संसद सुरक्षेचा भंग करत ११ डिसेंबर रोजी दोन देशातील तरूणांनी थेट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *