Breaking News

छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ओबीसींचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा आग्रह धरला. मात्र एक महिन्याचा कालावधी उलटून देखील राज्यातील नेतृत्वाने उमेदवारी जाहीर न झाल्याने मंत्री छगन भुजबळ यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. मंत्री छगन भुजबळ यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करून माघारीचा निर्णय मागे घेऊन नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी. ओबीसींचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांची दिल्लीत आवश्यकता आहे, अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने बैठकीत करण्यात आली.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली. त्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदासंघांतून उमेदवारी करावी असा सर्वांचा आग्रह आहे. याबाबत मंत्री छगन भुजबळ साहेब जो निर्णय घेतील तो निर्णय सर्वांना मान्य आहे असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी विदर्भ ब्राम्हण विकास मंच नाशिकच्या वतीने सचिव रुपेश जोशी यांच्या शिष्टमंडळाने मंत्री छगन भुजबळ यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत प्रदेश चिटणीस समाधान जेजुरकर, जिल्हाध्यक्ष डॉ.योगेश गोसावी, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, शहराध्यक्ष कविताताई कर्डक, महिला जिल्हाध्यक्ष योगिता आहेर, महिला शहराध्यक्ष आशा भंदुरे, अंबादास खैरे, योगेश निसाळ, संतोष खैरनार, दिलीप तुपे, गजू घोडके, ज्ञानेश्वर महाजन, नाना पवार, शिवा काळे, ज्ञानेश्वर शेवाळे, नितीन गायकवाड, रुपेश जोशी, अमोल नाईक, सुनील पैठणकर, प्रशांत लोहार, राजेंद्र जगझाप, किशोरी खैरनार, मेघा दराडे, मीनाक्षी काकळीज यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

देशभरात ओबीसी बांधवांसाठी काम करणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांची केंद्रीय नेतृत्वाने त्यांची दखल घेऊन त्यांना निवडणूक लढण्यास आग्रह धरला ही अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेसाठी अभिमानाची बाब आहे. केंद्रीय नेतृत्वाची घेतलेली दखल लक्षात घेऊन आपण संयमी भूमिका ठेवावी. नाशिकच्या विकासासाठी व ओबीसी बांधवांच्या न्याय हक्कासाठी मंत्री छगन भुजबळ यांची दिल्लीत आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांचे नेतृत्व हे दिल्लीत असावे. तसेच याबाबत मंत्री छगन भुजबळ हे जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल असे मत प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे व बाळासाहेब कर्डक यांनी व्यक्त केले. यावेळी प्रा.ज्ञानेश्वर दराडे, डॉ.योगेश गोसावी, कविताताई कर्डक, आशा भंदुरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त व विविध समाजाच्या बांधवानी आपले मनोगत व्यक्त केले.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *