Breaking News

Tag Archives: eknath shinde group

या दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री नेमके कोण? दोन्ही गटांकडून दावा रायगड- नाशिक जिल्हा पालकमंत्री पदाचा तिढा कायम

शिंदे गटाचे महाडचे आमदार भरत गोगावले रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आस लावून बसले असताना बुधवारी राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या सुधारीत यादीत रायगड आणि नाशिक जिल्ह्याचा तिढा सुटलेला नाही. तो अद्यापही कायम आहे. शिंदे फडणवीस सरकारमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदासाठी दोन नावे स्पर्धेत आहेत. राष्ट्रवादी कॉग्रेस आणि शिंदे गटात या पदासाठी रस्सीखेच सुरू …

Read More »

उध्दव ठाकरेंच्या त्या टीकेला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर, पक्षातील पदांसाठी मतदानच घेतले नाही शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिल्लीतून उत्तर

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रश्नी सध्या सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी प्रलंबित आहे. तसेच शिवसेना आणि पक्षचिन्ह कोणाला मिळणार याची उत्सुकता राज्यातील जनतेत निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यघटनेतील तरतूदीनुसार शिवसेना पक्षाची घटना आणि पदांची निर्मिती करण्यात आली. देशात लोकशाही आहे, असं …

Read More »

आदित्य ठाकरेंचा सवाल, ते ४० गद्दार सांगू शकतात का? राज्यातील जनतेला बंडखोरी आवडलेली नाही

शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे आज नाशिकच्या दौऱ्यावर असून बंडखोर शिंदे गटावर टीका केली. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात वातावरण इतकं पेटलं आहे जर आजच निवडणूक झाली तर निकालानंतर एकच रंग दिसेल तो म्हणजे भगवा भगवा आणि भगवा. आता काही लोक विचारतील की भगवा रंग कुणाचा? कुठल्या गटाचा? तर …

Read More »

शिंदे गटाच्या आमदार-खासदारांवरील कारवाईप्रश्नी ईडी विरोधात याचिका अँड. नितीन सातपुते यांनी दाखल केली याचिका

राज्यात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार असताना शिवसेनेचे आमदार आणि खासदारांना ईडीने अर्थात सक्तवसुली संचालनालयाने नोटीसा पाठविल्या. मात्र ज्यांना नोटीसा पाठविल्या त्या आमदार-खासदारांनी शिंदे गटाच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या विरोधात बंड पुकारत भाजपाशी हातमिळवणी केली. त्यानंतर या ईडीने काय कारवाई केली? की या सर्वांनी भाजपाशी हातमिळवणी केली म्हणून पुढची कारवाई …

Read More »

शिंदे-फडणवीस सरकारची आमदारांना खुली ऑफर, गडबड करायची नाही दुबईला प्लॅट मिळेल

राज्यात शिवसेनेचे बंडेखोर नेते एकनाथ शिंदे आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन होऊन चार महिने झाले. या चार महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह २० जणांचे मंत्रिमंडळ अस्तित्वात आले. राज्य सरकारची अनेक खात्यांना अद्यापही कॅबिनेट मंत्रीच नाही. तसेच राज्यमंत्र्यांची नियुक्ती तर नाहीच नाही. यापार्श्वभूमीवर …

Read More »

अब्दुल सत्तार सुप्रिया सुळेंना म्हणाले, भिक्कार## झाली असेल तर…

वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेत असणारे शिंदे-फडणवीस सरकारमधील कृषी मंत्री तथा शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना औरंगाबादेत वृत्तवाहीनीशी बोलताना शिवी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. लोकशाही या वृत्तवाहीनीच्या प्रतिनिधीने सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी अब्दुल सत्तार यांच्याकडे विचारणा केली. त्यावर अब्दुल …

Read More »

मुख्यमंत्री पुत्राच्या त्या फोटोला प्रत्युत्तर देण्याच्या नादात शीतल म्हात्रे आल्या अडचणीत सुप्रिया सुळे यांचा मार्फिंग फोटो ट्विट केल्याने पोलिसात गुन्हा दाखल

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून काम करत असल्याचा फोटा नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विट करत टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या राजकिय कृत्याला प्रत्युत्तर म्हणून एकनाथ शिंदे गटाच्या समर्थक शीतल म्हात्रे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला मॉर्फिंग केलेला फोटो ट्विट …

Read More »

उध्दव ठाकरेंच्या बाप चोरणारी टोळीला शिंदे गटाचे प्रत्युत्तर, मग शिवाजी महाराज… शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रपुरूष

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोरेगांव येथील नेस्को मैदानावर झालेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यामध्ये पक्षात फूट पाडणारे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना लक्ष्य करताना दुसऱ्याचे बाप पळविणारी टोळी सध्या सक्रिय असल्याची टीका केली. तसेच बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आणि नाव न घेता निवडणूका लढण्याचे आव्हान उध्दव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना …

Read More »

पोलिसांचा हवाला देत मुंबई महापालिकेने नाकारली शिंदे गट-ठाकरे गटाला परवानगी परवानगी दिल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल

नवरात्रोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे. त्यामुळे दसऱ्यानिमित्त शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा होणार की नाही याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी मुंबई महापालिकेला दिलेल्या अहवालाच्या आधारे मुंबई महापालिकेने शिंदे गट आणि उध्दव ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी नकारघंटा कळविला आहे. तसे पत्रही शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांना …

Read More »

आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याच्या आतली बातमी उदय सामंत समर्थकांकडून बाहेर आदित्य ठाकरे यांचा रत्नागिरी दौरा ! खुर्च्या एक हजार गप्पा दहा हजाराच्या..!

उद्या शुक्रवारी १६ सप्टेंबर रोजी माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे रत्नागिरीत येत आहेत. यापार्श्वभूमीवर उदय सामंत यांच्या समर्थकांकडून एक बातमीवजा आतली माहिती व्हायरल करण्यात येत आहे. सदरची बातमी खालील प्रमाणे… आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावर चर्चा व नियोजन करण्यासाठी रत्नागिरीत एक बैठक नुकतीच पार पडली. सुरूवातीला या दौऱ्याचा खर्च कोणी करायचा …

Read More »