Breaking News

Tag Archives: अजित पवार गट

महायुतीत आणि महाविकास आघाडीत नेमका वरचष्मा कोणाचा?

देशात लोकसभा निवडणूकीचे रणशिंग फुकले गेले आहे. मात्र भाजपाच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील महायुतीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाली आहे. तर दुसऱ्याबाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकाराने निर्माण झालेल्या महाविकास आघाडीत शिवसेना उबाठा गटाचा समावेश आहे. या दोन्ही तिन्ही पक्षांच्या आघाडी आणि युतीतील …

Read More »

सुनिल तटकरे यांचा दावा, जागावाटपाचा निर्णय सामंजस्याने- सामोपचाराने होईल

येत्या एक – दोन दिवसात तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते दिल्लीत बसून जागावाटपाचा निर्णय सामंजस्याने आणि सामोपचाराने करतील असे सांगतानाच तिन्ही पक्षाने महाराष्ट्रात ४५ पेक्षा अधिक जागा निवडून आणण्याचा निर्धार केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली. बुधवारी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते अजित पवार, …

Read More »

राहुल नार्वेकरांचे निकाल वाचनः दोन्ही राष्ट्रवादीचे आमदार पात्र, पण पक्ष अजित पवारांचा

डिसेंबर २०२३ च्या अखेरीस शिवसेना पक्षातील फुटीच्या दाव्यावर निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळ पक्षाला अधिकृत पक्षाची मान्यता देत शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्या गटाचा असल्याचा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष हा मुळ पक्ष नसल्याचा निकाल दिला. मात्र दोन्ही गटाच्या आमदारांनी परस्पराच्या विरोधी गटातील आमदारांवर …

Read More »

हसन मुश्रीफ यांना मराठा बांधवांनी भरस्त्यात अडवलं; करावा लागला रोषाचा सामना हसन मुश्रीफ यांचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवत केली राजीनाम्याची मागणी

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार काढले  तर दुसरीकडे जरांगे पाटलांच्या अहवानानंतर राज्यातील विविध जिल्ह्यातील गावांमध्ये पुढाऱ्यांना प्रवेश बंदी करण्यात आली, तसेच राज्यातील राजकीय नेत्यांना देखील मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे आज अनेक गावांमध्ये नेत्यांना मराठा बांधवांना प्रवेशबंदी केली आहे. …

Read More »

या दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री नेमके कोण? दोन्ही गटांकडून दावा रायगड- नाशिक जिल्हा पालकमंत्री पदाचा तिढा कायम

शिंदे गटाचे महाडचे आमदार भरत गोगावले रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आस लावून बसले असताना बुधवारी राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या सुधारीत यादीत रायगड आणि नाशिक जिल्ह्याचा तिढा सुटलेला नाही. तो अद्यापही कायम आहे. शिंदे फडणवीस सरकारमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदासाठी दोन नावे स्पर्धेत आहेत. राष्ट्रवादी कॉग्रेस आणि शिंदे गटात या पदासाठी रस्सीखेच सुरू …

Read More »

धनंजय मुंडे यांनी घेतली आत्महत्याग्रस्त त्या कुटुंबातील चार मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी 'त्या' कुटुंबाना तात्काळ मदत मिळवून देण्याचे निर्देश;आत्महत्या केल्याने प्रश्न सुटत नाहीत तर वाढतात - धनंजय मुंडे

जिल्ह्यातील मनोज राठोड व नामदेव वाघमारे या दोन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबापैकी एका शेतकऱ्याच्या चारही मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली आहे. यवतमाळ दौऱ्यावर असताना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी हे जाहीर केले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मनोज राठोड व नामदेव वाघमारे या दोन शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली …

Read More »

शरद पवार यांची फुटीरांना सज्जड दम; जीवंतपणी माझा फोटो…. कालच्या वक्तव्यानंतर अजित पवार आणि त्यांच्या गटाला दिली समज

राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी थेट शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले. तसेच सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतरही आमच्या पक्षाचे नेते शरद पवार असल्याचे आणि आम्ही अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असल्याचे अजित पवार गटाकडून जाहिर केले. या पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील फुटीर गटाला परवानगीशिवाय फोटो …

Read More »