Breaking News

हसन मुश्रीफ यांना मराठा बांधवांनी भरस्त्यात अडवलं; करावा लागला रोषाचा सामना हसन मुश्रीफ यांचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवत केली राजीनाम्याची मागणी

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार काढले  तर दुसरीकडे जरांगे पाटलांच्या अहवानानंतर राज्यातील विविध जिल्ह्यातील गावांमध्ये पुढाऱ्यांना प्रवेश बंदी करण्यात आली, तसेच राज्यातील राजकीय नेत्यांना देखील मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे आज अनेक गावांमध्ये नेत्यांना मराठा बांधवांना प्रवेशबंदी केली आहे.

आज सकाळी भाजपा खासदार प्रतापराव चिखलीकर यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले अशातच आता राष्ट्रवादीचे नेते आणि कोल्हापूर जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना देखील मराठा समाजाच्या संतापाचा सामना करावा लागला आहे.  कोल्हापूर जिल्ह्याच्या गारगोटीत मराठा समाजाने हसन मुश्रीफ यांची गाडी अडवली आणि घेराव घातला. मराठा समाजाला आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने फसवल्याची भावना नागरिकांना व्यक्त केली.

मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील मराठा समाजाच्या भावना समजून घेतल्या आणि लवकरच मराठा समाजाला आरक्षण मिळणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. मराठा आंदोलकांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे राजीनाम्याची देखील मागणी केली आहे. गारगोटी येथे आजपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून साखळी उपोषणाला सुरुवात होणार असून यापुढे एकाही नेत्याला गावामध्ये प्रवेश दिला जाणार नाही असा फलकचे लावण्यात आला आहे.

आज सकाळी असाच प्रकार नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या बरोबर घडला यावेळी मराठा बांधवांच्या रोषाला चिखलीकर यांना सामोरं जावं लागलं. खासदार प्रताप पाटील चिखलीकर गुरुवारी रात्री नांदेड येथील कंधार तालुक्यातील अंबुलगा गावात गेले होते. खासदार चिखलीकर गावात आल्याचं लक्षात येताच गावकरी आक्रमक झाले यावेळी त्यांच्या गादीवर दगडफेक करण्यात आली होत.

 

 

Check Also

काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर म्हणाले, वर्षा गायकवाड माझ्या लहान बहिण

लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारीवरून काहीसे नाराज झालेल्या काँग्रेसचे माजी आमदार नसीम खान यांनी काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *